लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा शनिवारी दुपारी बंद पडली. सुट्टी असल्याने रस्त्यावर गर्दी होती. अनेकजण सहकुटुंब मोटारी घेऊन बाहेर पडले होते. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे प्रमुख रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. प्रमुख रस्त्याला लागून असणाऱ्या गल्ली बोळात कोंडी झाली होती. मध्यभागातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केले, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
आणखी वाचा-स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आला आणि खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला…
शनिवारी अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडतात. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सिग्नल यंत्रणा सायंकाळी कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाल्याने ठिकठिकाणी कोंडी झाली.