पुणे : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी १५ वर्षीय मुलगी जखमी झाली.

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

हेही वाचा : चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वर्षाराणी राहुल बोरावके (वय ३६ रा. गाडीतळ, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मुलगी समृद्धी राहुल बोरावके (वय १५) जखमी झाली. या प्रकरणी ट्रकचालक किरण रामकृष्ण सानप (वय २२, रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अटक करण्यात आली. राहुल बाेरावके (वय ४४) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार वर्षाराणी आणि त्यांची मुलगी समृद्धी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील लक्ष्मी काॅलनी परिसरातून जात होत्या. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार वर्षाराणी आणि समृद्धी यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षाराणी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालक किरण सानप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.