पुणे : सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जुन्या मुंबई – पुणे रस्त्यावर खडकीतील चर्च चौकात घडली.

हेही वाचा – पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

हेही वाचा – पुणे : विश्रांतवाडी आरटीओत आग, जप्त केलेली १० वाहने भस्मसात

मधुरा शैलेश मिश्रा (वय २१, रा. निगडी ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक रवि देवानंद नाडे (रा. वाघोली ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुराचा मित्र मंदार तांबे (वय २० रा. निगडी ) याने फिर्याद दिली आहे. मंदार आणि मधुरा कामानिमित्त पुण्यात आले होते. पुण्यातील काम आटोपून ते दुचाकीवरून जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून निगडीकडे निघाले होते. खडकीतील चर्च चौकात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने (मिक्सर) दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार मधुरा आणि सहप्रवासी मंदार रस्त्यावर पडले. त्या वेळी ट्रकच्या चाकाखाली सापडून मधुराचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.