विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली. त्यानुसार देशभरात २१ बोगस विद्यापीठे असून, सर्वाधिक बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत. तर या यादीत राज्यातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोगस विद्यापीठांची संख्या घटली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : करोनानंतर तरुणांमध्ये वाढतोय सांधेदुखीचा त्रास

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस २१ विद्यापीठाची संकेतस्थळावर यादी जाहीर केली आहे. गेल्यावर्षीच्या यादीमध्ये २४ बोगस विद्यापीठे होती. त्यामुळे यंदा तीन विद्यापीठे कमी झाल्याचे दिसून येत आहे. यूजीसीच्या नव्या यादीनुसार दिल्लीमध्ये आठ, उत्तर प्रदेशमधील चार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये प्रत्येक एक बोगस विद्यापीठ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासातील व्यक्तींना कर्करोगाचा धोका सर्वाधिक

विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय,राज्य आणि अभिमत विद्यापीठांना किंवा संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार संस्थांनाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अन्य संस्थांना नावात विद्यापीठ हा शब्द वापरता येत नाही. संबंधित २१ संस्था विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना बोगस ठरवण्यात आले आहे, त्यांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार नसल्याचे यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty one fake universities across the country pune print news amy