पुणे : सांगली रेल्वे स्थानकावर बंगळुरू-जोधपूर-बंगळुरू आणि उदयपूर-म्हैसूर-उदयपूर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरूमधून सुटणारी बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस गाडी ९ एप्रिलपासून सांगली स्थानकावर दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी पोहोचेल आणि १ वाजून १० मिनिटांनी पुढे रवाना होईल. जोधपूरहून सुटणारी जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस १२ एप्रिलपासून सांगली स्थानकावर सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी पोहोचेल आणि ७ वाजता पुढे रवाना होईल.

उदयपूरहून सुटणारी उदयपूर-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस १० एप्रिलपासून सांगली स्थानकावर रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल आणि १० वाजून ३५ मिनिटांनी पुढे रवाना होईल. म्हैसूरहून सुटणारी म्हैसूर-उदयपूर हमसफर एक्स्प्रेस १३ एप्रिलपासून सांगली स्थानकावर दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी पोहोचेल आणि २ वाजून ४० मिनिटांनी पुढे रवाना होईल, असे रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more trains will stop at sangli railway station pune print news stj 05 ysh