पुणे : राज्य मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात पसरल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याची माहिती असून, या प्रकाराची राज्य मंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजनाही करण्यात येत असूनही गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झालेल्या गैरप्रकारात काही शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात फिरल्याचे दिसून आले. सिंदखेड राजा येथे हा प्रकार झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा – जनतेच्या मनातील आमदार मीच म्हणणाऱ्या बंडखोर राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त!

हेही वाचा – महापालिका निवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपसमोर आव्हान

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक म्हणाल्या की, गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात फिरत असल्याचे निदर्शनास आले. सहायक परीरक्षकाकडून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. मात्र त्यानंतर या प्रश्नपत्रिकेची दोन पाने कशी समाज माध्यमात आली, किती विद्यार्थ्यांपर्यंत ही पाने पोहोचली याची चौकशी करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two pages of the 12 th mathematics question paper leaked seen on social media pune print news ccp 14 ssb