पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसर, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हडपसर भागात दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. विठ्ठल दत्तू मर्ढेकर (वय ४९, रा. पाॅवर हाऊस, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत मर्ढेकर यांची पत्नी चंदा (वय ४०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मर्ढेकर हे ६ फेब्रुवारी रोजी हडपसर भागातील संजीवनी हाॅस्पिटललसमोरुन सायंकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने मर्ढेकर यांना धडक दिली. अपघातात त्यांच्या पायाला मोठी जखम झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर मांजरी परिसरात भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. सौरभ कैलास इंदलकर (वय २३, रा. कवडीपाट, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सूरज कदम (वय १८, रा. कवडी पाट, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि सौरभ नातेवाईक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूरज आणि त्याचा आतेभाऊ सैारभ हे सोमवारी (१० मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. मांजरी परिसरातील शेवाळवाडी परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात सहप्रवासी सौरभ गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार सूरज याला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अले. उपचारांपूर्वीच सौरभ याचा मृत्यू झाल्यचो डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या वाढल्या आहेत. बहुतांश अपघात भरधाव अवजड वाहनांमुळे झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people died in separate accidents in pune city pune print news rbk 25 ssb