पिंपरी- चिंचवड: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वैष्णवीच्या दोन भावांसह मैत्रिणीचा असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्याचबरोबर वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेले चांदीची काही भांडे यामध्ये पाच ताट, पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा जप्त करण्यात आला आहे.

आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडे असलेले परवानाधारक पिस्तूल देखील पिंपरी- चिंचवड पोलिसांनी जप्त केले आहेत. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सात दिवस बेपत्ता होते. त्यांना शुक्रवारी पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकल्या, सुशील आणि राजेंद्र हगवणे वेगवेगळ्या महागड्या आणि आलीशान वाहनातून जिल्ह्यामध्येच वावरत होते.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत म्हणून वाहन देण्यात आले होते. त्या गाड्या, आलिशान वाहन पिंपरी- चिंचवड, बावधन पोलीस जप्त करत आहेत. काल देखील बावधन पोलिसांनी थार ही आलिशान गाडी आणि आज इंडीवर गाडी जप्त केली आहे. यापुढे देखील पिंपरी- चिंचवड पोलीस या प्रकरणात आणखी सखोल तपास करत असून शशांक आणि राजेंद्र हगवणे ज्या- ज्या वाहनांनी गेले तिथली वाहन जप्त करणार असल्याची माहिती बावधन पोलिसांनी दिली आहेत.