पुणे : वानवडी परिसरात दुचाकीस्वार टोळक्याने तरूणाला अडवून त्याच्यावर वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केल्याची घटना २८ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास शिंदे वस्तीवरील एसआरए इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे.

एस. सचिन कांबळे (वय २०, रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ४४ वर्षीय तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिंदे वस्ती परिसरात थांबलेले असताना, दुचाकीस्वार पाचजणांनी त्यांना गाठले.

त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली.

त्यानंतर परिसरात मोठमोठ्याने आरडाओरड करीत शांतता भंग केली. याप्रकरणी कांबळेला अटक करीत असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.