लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालकाला धमकावून त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब (पुजारी) याच्यावर दबाव टाकण्यात आला. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि वडील विशाल यांनी मोटारचालक गंगाधर याला धमकावून त्याचा मोबाइल संच काढून घेतला, तसेच त्याला वडगाव शेरीतील बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी अगरवाल याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-Pune Accident Case : अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांची चौकशी सुरू, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मोटारचालकाला धमकाविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक विशाल अगरवाल याला अटक केली जाणार आहे. याबाबत पोलिसांनी शनिवारी न्यायालयात विशाल अगरवालचा ताबा मिळवण्यासाठी (प्रॉडक्शन वॉरंट) अर्ज दाखल केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal agarwals problems increase possibility of arrest in second crime pune print news rbk 25 mrj