लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ससून रुग्णालय परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी (१६ ऑगस्ट) करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (१७ ऑगस्ट) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
आणखी वाचा-मोसमी पावसाची उघडीप, पोषक स्थिती अभावी पाच दिवस पावसाची विश्रांती
पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, ससून सर्वोपचार रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबागपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतच्या दोन्ही बाजूंचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी आणि जुना बाजार परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
© The Indian Express (P) Ltd