मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्राच्या खिशातुन मोबाईल काढला या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादात दगडाने ठेचून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी- चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. नारायण वसंत वाघमारे असे हत्या झालेल्या तरुणाची नाव आहे. याप्रकरणी अमर उर्फ एक्का गौतम कसबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मयत नारायण यांचे बंधू भगवान वसंत वाघमारे यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुणे: सहायक पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हेही वाचा… पुणे: मित्राच्या मोबाइलवर संदेश पाठवून खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर आणि हत्या झालेला नारायण हे दोघे मित्र होते. शुक्रवारी, दुपारी तीनच्या सुमारास हे दोघे इंद्रायणी नगर येथील यशवंत चौकात गप्पा मारत थांबले, दोघांनी मद्यपान केला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. मस्करीत अमरच्या खिशातील नारायणने मोबाईल काढला याच रागातून दोघांमध्ये वाद झाले. अमरने नारायणला हाताने मारहाण करत जमिनीवर पाडले. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या नारायणला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अमरला अटक करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While taking drinks a person killed his friend because he took mobile from his pocket kjp 91 asj