Ajit Pawar on Pune Traffic: पुण्यातील मुंढवा केशवनगर परिसरातील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज सकाळी स्वतः पाहणी करण्यासाठी पोहोचले. सकाळी सहा वाजता त्यांनी आपला पाहणी दौरा सुरू केला. तसेच मुंढवा केशवनगर भागात होत असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत स्थानिक महिलांनी अजित पवारांना प्रश्न विचारले. यावेळी एका महिलेने थेट मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख केला. यानंतर अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

अजित पवारांचा दौरा सुरू असताना स्थानिकांच्या प्रश्नांचा त्यांना सामना करावा लागला. मुंढवा केशवनगर भागात वाहतुकीची प्रचंड समस्या असल्याचे काही महिलांनी सांगितले. तसेच पर्रीकर जसे ट्राफिक बघण्यासाठी फिरायचे, तसेच तुम्ही कधीतरी फिरा आणि पाहा, असे एका महिलेने सांगितले.

यावर अजित पवार विचार करत होते आणि नंतर ते म्हणाले पर्रीकर कोण? यावर सदर महिलेने गोव्याचे मंत्री होते असे सांगितले. पर्रीकर दिवसा वाहतुकीची समस्या बघण्यासाठी शहरात फिरत असत. तुम्हीही त्याचप्रकारे कोणतीही माहिती न देता जेव्हा वाहतूक कोंडी असते, तेव्हा या परिसरात येऊन बघा, असेही या महिलेने अजित पवार यांना सांगितले.

पाण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा तातडीने फोन

दरम्यान या परिसरात कोट्यवधींचे फ्लॅट घेऊन बिल्डरांकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाही, अशीही तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. रस्त्यांची दुरवस्था आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्या बाबत नागरिकांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन केला आणि घटनास्थळी येण्यास सांगितले.

तसेच बिल्डर जर नागरिकांना सुविधा देत नसतील तर त्यांचे काम थांबवू, असेही अजित पवार म्हणाले.

मद्य विक्रेत्यांना तंबी

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन केला नागरिक दारू पीत बसतात. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन केला, असाही तक्रारीचा पाढा नागरिकांनी वाचला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मद्याचे दुकान कुणाचेही असले तरी आमच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ती वेळ येऊ देऊ नका. दुकानाबाहेर मद्य पिण्याचे प्रकार लगेच बंद झाले पाहिजेत. विक्री करायला परवानगी आहे. पण ज्याला प्यायची असेल त्याला घरी जाऊन पिण्यास सांगा.