पुणे : मागील महिन्यात कर्नल पुरोहित यांच्यावर आधारित ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तक प्रकाशनाला पुण्यात परवानगी देण्यात आली. पण इशरत जहाँ एन्काउंटर पुस्तक प्रकाशनाला पोलीस परवानगी का देत नाही, असा सवाल मुल निवासी मुस्लीम मंचाचे अंजुम इमानदार यांनी उपस्थित केला आहे. तर आता आम्ही पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना ते पुस्तक भेट देणार असून, कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंजुम इनामदार म्हणाले की, 2004 मध्ये इशरत जहाँ या तरुणीचा एन्काउंटर झाल्याची घटना घडली होती. या घटनेमागे कोणती व्यक्ती आणि विचारसरणी आहे हे देशातील जनतेला माहिती असून या प्रकरणाची चर्चा देशभरात रंगली होती. या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयाने देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. आता या सर्व घडामोडी लक्षात घेता, ही घटना सर्वांसमोर येण्याच्या दृष्टीने वाहिद शेख यांनी इशरत जहाँ एन्काउंटर पुस्तकाचे लिखाण केले. त्यानंतर पुण्यातील आझाम कॅम्पस, गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथील हॉल या दोन ठिकाणी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी परवानगी नाकारली. एका बाजूला मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील कर्नल पुरोहित यांच्यावरील आधारित ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड या पुस्तक प्रकाशनाला याच पुण्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली जाते. आता इशरत जहाँ एन्काउंटर हे पुस्तक पोलीस प्रशासन प्रकाशन करण्यास परवानगी का देत नाही. यातून पोलीस देखील कोणाच्या तरी दबावाखाली काम करित आहे. हे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – पुणे : व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून झालेल्या वादात बांधकाम व्यावसायिकाकडून तरुणावर गोळीबार

हेही वाचा – पुणे : पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती, बीएमसीसीचा पुढाकार, देशातील पहिले महाविद्यालय असल्याचा दावा

अंजुम पुढे म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाबाबत पोलीस उपायुक्त गिल यांच्यासोबत चर्चा झाली असून आजचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही लवकरच कार्यक्रमाची तारीख जाहीर करू, पण त्यापूर्वी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना इशरत जहाँ एन्काउंटर हे पुस्तक भेट देणार.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will give ishrat jahan encounter book to pune cp ritesh kumar says anjum immandar in pune svk 88 ssb