पिंपरी : संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेत २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. सुजल सुनील मनकर (२१) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल हा आकुर्डी येथील महाविद्यालयात बीसीएस अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने सोमवारी सायंकाळी संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याचे कुटुंबीय आणि मित्र रुग्णालयात आले असता पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी घरच्या आर्थिक अडचणींमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth jumps from metro station in pimpri pune print news ggy 03 amy