स्वयंपाक ही आपल्याला लोकांच्या पोटातून त्यांच्या हृदयापर्यंत पोचवणारी एक सुरेख आणि जीवनावश्यक कला असल्याचं म्हटलं जातं. उत्तम स्वयंपाक करणारी व्यक्ती प्रत्येकाला आवडते कारण त्यांच्यामुळे आपणाला अनेक चांगले पदार्थ खायला मिळतात. आता दिवसेंदिवस स्वयंपाक कला बदलत आहे. ज्यामुळे आपणाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि वेगवेगळ्या भाज्यांचे उपयोग करुन तयार केलेले पदार्थ खायला भेटतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाय असे नवनवीन पदार्थ आपणालाही बनवता यावे असे अनेक गृहिणींना आणि अनेक युवकांनाही वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. प्रत्येकाला गोड पदार्थ खायला आवडतात. गोड पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही आणि त्यात जर शिरा खायचा असेल तर बोलायलाच नको. आपण आजपर्यंत रव्यापासून ते गाजराचा शिरा खाल्ला आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला मुगाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत. मुगाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे –

हेही वाचा- कच्च्या टोमॅटोची झणझणीत चटणी कधी ट्राय केलीय? नसेल तर आजचं बनवा ही सोपी रेसिपी

साहित्य –

  • २ वाट्या भिजलेल्या मूगडाळीचं जाडसर वाटण (भिजवून बारीक केलेल)
  • रवा ४ चमचे
  • साजूक तूप ४ चमचे
  • वेलची पूड पाव चमचा
  • काजू-बदामाचे काप
  • दूध १ वाटी

हेही वाचा- तांदळाची भाकरी खाऊन कंटाळा आलाय? तर आता बनवा तांदळाचे खमंग थालीपीठ, पाहा रेसिपी

शिरा बनवण्याची कृती –

गूळ १ वाटी कृती- मूगडाळीचं वाटण आणि रवा तुपात चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. या मिश्रणामध्ये दूध घालून ते मिश्रण चांगलं शिजवून घ्या. या सर्व मिश्रणात काजू-बदामाचे काप, वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा. त्यानंतर मुगाचा शिरा तयार होईल जो तुम्ही कुटुंबीयांसोबत आवडीने खा. मुगाचा शिरा खायचा चांगला असतोच शिवाय तो शिरा स्निग्ध, बलवर्धक, रुचिवर्धक असतो.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooking tips learn how to make mugacha shira recipe jap