How To Make Vangyache Kurkurit Kaap : वांगीची भाजी आणि त्याचे पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. पण , काही जणांना वांग्याची भाजी खायला कंटाळा येतो. मग अशा मंडळींसाठी नक्की काय बनव्याचं असा प्रश्न समोर उभा राहतो. तर आज आपण झटपट होणारे वांग्याचे काप कसे बनवायचे याबद्दल जाणून घेणार आहोत….
साहित्य
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा धनेपूड
- १/२ चमचा गरम मसाला
- मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ वांग
- लिंबाचा रस
- १/२ कप बारीक रवा
- शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
- तेल
कृती
- लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ आणि धणे मिक्स करून घ्या; अशाप्रकारे काप बनवण्यासाठी मसाला तयार आहे.
- वांगी चांगले धुवून वाळवा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्याचे तुकडे करा आणि त्यावर मीठ शिंपडा.
- नंतर कापांवर मसाला शिंपडा आणि दोन्ही बाजूंनी लेप द्या.
- तसेच प्रत्येक स्लाईसवर लिंबाचा रस शिंपडायला विसरू नका.
- नंतर बारीक रव्यामध्ये मीठ आणि उरलेला मसाला घाला आणि चांगले मिक्स करा.
- प्रत्येक स्लाईसवर दोन्ही बाजूंनी रवा लावून घ्या.
- मग एका कढईत तेल गरम करायला ठेवा.
- नंतर त्यात काप टाका.
- खालची बाजू चांगली तळली जाईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत चांगल्यापैकी तळून घ्या.
- दोन्ही बाजू चांगले तळल्यावर एका डिशमध्ये काढा. वांग्याचे काप तयार आहेत.
ही रेसिपी @MadhurasRecipeMarathi यांच्या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आली आहे.