Summer Season Drinks Recipe: गूळ हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. गुळाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या महिन्यात आपल्याला अनेकदा डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी आपण नेहमी गुळाचे सेवन करायला हवे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यात गुळाचे सरबत पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे बनवायला खूप सोपे आहे आणि तुम्ही ते बनवून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता. वाढत्या तापमानात गुळाचे सरबत शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते. जर तुम्हाला उन्हाळ्यात एनर्जी ड्रिंक्स आवडत असतील तर तुम्ही आंबा पन्ना, दही लस्सी, उसाचा रस यांसारख्या पेयांसह गुळाचे सरबत समाविष्ट करू शकता. गुळापासून बनवलेल्या सरबताची चवही खूप छान असते.चला जाणून घेऊया गुळाचे सरबत कसे बनवायचे.

गुळाचे सरबत साहित्य

१/४ मेजरींग कप सेंद्रिय गुळाचा कीस
५-६ पुदिना पाने
१/४ टिस्पून काळ मीठ
१ लिंबाचा रस
५-६ बर्फाच्या क्युब
१ ग्लास पाणी

गुळाचे सरबत कृती

१. गुळाचे सरबत करण्यासाठी भांड्यात पाणी घ्या.

२. आता त्यात गूळ भिजवून चांगले मिसळा.

३. गूळ विरघळल्यावर चाळणीतून गाळून घ्या.

४. आता त्यात भिजवलेला सब्जा टाका.

५. आता वर लिंबाचा रस मिसळा.

६. आता पुदिन्याची पाने बारीक करून मिक्स करा.

७. यानंतर, सरबत १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर फ्रीजमधून काढून सर्व्हिंग ग्लासमध्ये ठेवा, बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.

हेही वाचा >> संत्र्यापेक्षा सहा पट जास्त व्हिटॅमिन ‘सी’ असलेले काजु बोंडाचे सरबत; ‘ही’ घ्या सोपी मराठी रेसिपी

गूळ सरबताचे फायदे

१. उष्माघातापासून संरक्षण करते

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी गुळाचे सरबत उपयुक्त आहे. हे शरबत प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि अचानक उष्मा आणि थंडीचा त्रास होत नाही. याशिवाय, गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराचे पीएच संतुलित राहण्यास आणि वाढत्या आणि घसरत्या तापमानात ते निरोगी राहण्यास मदत होते.

२. लोहाची कमतरता दूर करते

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गुळाचे सरबत पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. वास्तविक, गुळात भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे जर तुम्हाला अॅनिमिया असेल तर तुम्ही गुळाचे सरबत प्यावे.

३. लिव्हर डिटॉक्समध्ये उपयुक्त आहे

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळाचे सरबत प्यायल्याने पाचक एंझाइम सक्रिय होतात आणि बद्धकोष्ठता टाळते. पण खास गोष्ट म्हणजे ते लिव्हर डिटॉक्स करते आणि शरीर स्वच्छ करते. याशिवाय, त्यातील पोटॅशियम शरीरात हायड्रेशन वाढवण्यास आणि स्नायूंच्या वाढीस मदत करते. अशा प्रकारे हे सरबत शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaggery sharbat recipe how to make jaggery sharbat benefits for summer season stomach pain relief see the recipe srk