Mirchi Bhajji : भजे हा असा खाद्यप्रकार आहे जो अनेकांना आवडतो. बटाटा भजी, कांदा भजी, मूग भजी, कोबी भजी असे अनेक भज्यांचे प्रकार आपण आवडीने खातो. काही लोकांना तिखट खायची खूप सवय असते किंवा त्यांना मिरची खायला आवडते अशा लोकांना मिरची भजी सुद्धा खूप आवडतात. आज त्यांच्यासाठी आम्ही खास कोल्हापूर स्पेशल मिरची भजी कशी बनवायची, हे सांगणार आहोत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • बेसण
  • हिरवी मिरचे
  • बेकींग सोडा
  • मीठ
  • पाणी
  • तेल

हेही वाचा : Masala Maggi : मॅगी प्रेमींनो, दहा मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मसाला मॅगी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या

कृती

  • सुरुवातीला बेसणमध्ये मीठ टाकावे आणि त्यात पाण्याने पीठ घट्ट भिजवावे
  • त्यानंतर हे पीठ पाच मिनिटे झाकून ठेवावे.
  • एका कढईत तेल गरम करावे
  • घट्ट पीठात थोडे पाणी टाकावे आणि बेकींग सोडा टाकावा
  • त्यानंतर त्यात कढईतील एक चमचा गरम तेल टाकावे.
  • या पीठात मिरच्या बुडवून तेलातून मंद आचेवर तळून घ्याव्यात
  • गरमा गरम मिरची भजी तयार होणार.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur special mirchi bhajji recipe how to make chilly how to make chilli bajji spicy food ndj