Masala Maggi : मॅगी हा असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. मॅगी अगदी कमी वेळात बनवता येणारी रेसिपी आहे. लहान मुलांची आवडती डिश म्हणून मॅगीला ओळखले जाते. मॅगीचे अनेक प्रकार आहे पण तुम्ही कधी मसाला मॅगी खाल्ली आहे का? स्वादिष्ट अशी मसाला मॅगी कशी बनवायची? चला तर जाणून घेऊ या ही सोपी रेसिपी…

साहित्य

  • मॅगी
  • मॅगी मसाला
  • कांदे
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • मीठ
  • हळद
  • तेल
  • जिरे
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • वाटाणा
  • शेंगदाणे

हेही वाचा : Upvasacha Dhokla : उपवासाचा ढोकळा खाल्ला का? नवरात्रीमध्ये असा बनवा खमंग ढोकळा

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

कृती

  • सुरुवातीला एका कढईत तेल गरम करा
  • गरम तेलात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाका
  • जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे आणि वाटाणा टाका.
  • बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका आणि चांगले परतून घ्या
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि मीठ घाला.
  • मॅगी मसाला टाका
  • त्यावर बारीक चिरलेले टोमॅटो टाका.
  • टोमॅटो शिजले की त्यात मॅगीच्या प्रमाणानुसार पाणी टाका.
  • पाणी उकळायला आले की त्यात मॅगी टाका.
  • मॅगी चांगली शिजू द्या.
  • सर्व्ह करण्यापूर्वी मॅगीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.