Lays Paneer Bites Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आज आपण पनीरची एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत जी घरच्या घरी झटपट बनेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

२०० ग्रॅम पनीर

१ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर

१ चमचा चाट मसाला

१ चमचा काळं मीठ

१ चमचा गरम मसाला

२ चमचे मोहरीचं तेल

एक पॅकेट लेज (Lays)

हेही वाचा… तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी

कृती

  1. २०० ग्रॅम पनीर घ्या. त्याचे समान तुकडे करा.
  2. एका बाऊलमध्ये १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, १ चमचा चाट मसाला, १ चमचा काळं मीठ, १ चमचा गरम मसाला आणि २ चमचे मोहरीचं तेल घाला.
  3. पनीरचे तुकडे त्यात घालून १५ मिनिटं ठेवा.
  4. एक पॅकेट लेज (lays) घ्या. ते छान कुटून घ्या.
  5. पनीरचे तुकड्यांना लेजच्या क्रंब्सने व्यवस्थित कोट करा.
  6. गरम तेलात तळा जोपर्यंत ते सोनेरी होईपर्यंत नाहीत.
  7. तुमचे चविष्ट लेज पनीर बाइट्स तयार आहेत. चव आणि आनंद घ्या!

हेही वाचा… दुधी भोपळ्याची रिंग भजी; हिवाळ्यात पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करा

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/p/DEy9AzOPL-b/

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lays paneer bites recipe in marathi easy paneer recipe dvr