leftover roti ladoo marathi recipe : लाडू हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता पदार्थ आहे. लाडू विविध साहित्य वापरून बनवता येतो. यात मोतीचूर लाडू, बेसन लाडू, नारळाचे लाडू, रवा लाडू, शेंगदाणा लाडू, बुंदीचा लाडू, बेसनचा लाडू आदींचा समावेश असतो. त्याचप्रमाणे आपण पोळीचे लाडू (leftover roti ladoo) देखील बनवू शकता. जर तुम्हाला मिठाई खाण्याची खूप इच्छा आणि काहीतरी पौष्टीकही हवं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहू शकता. चला तर हा पदार्थ कसा बनवायचा? यासाठी साहित्य काय लागेल जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१. रात्री उरलेल्या किंवा ताज्या पोळ्या
२. अर्धा चमचा वेलची पावडर
३. एक चमचा भाजलेली खसखस
४. बेदाणे
५. साखर
६. तूप

हेही वाचा…Anant Chaturdashi 2024 : बाप्पासाठी करा खास ‘कॉफी-अक्रोड’चे मोदक; रेसिपी लिहून घ्या पटकन

कृती :

१. तुमच्या रात्री उरलेल्या किंवा ताज्या पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
२. परातीत तूप व साखर फेटावे. (टीप – बारीक करून घेतलेल्या पोळीच्या मिश्रण किती वाटी होतंय हे पाहून त्यात साखर घाला.)
३. त्यात भाजलेली खसखस, पोळीचे मिस्करमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण, बेदाणे घाला.
४. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
५. नंतर लाडू वळण्यास सुरुवात करा.
६. अशाप्रकारे तुमचे ‘पोळीचे लाडू’ (leftover roti ladoo) तयार.

अनेकदा मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरतो. अशावेळी घरच जेवण उरते. मग अनेकदा आई उरलेल्या भाताला फोडणी देते किंवा शिळ्या पोळीचा चिवडा बनवते. पण, नेहमीच पोळीचा चिवडा खाण्यापेक्षा, यावेळी तुम्ही पोळीचे लाडू बनवून पाहा आणि लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना खायला द्या. अगदी दुपारी ऑफिसमध्ये असताना एक घरी देखील भूक लागल्यावर तुम्ही पोळीचा हा एक लाडू (leftover roti ladoo) खाऊ शकता आणि तुमच्या दुपारच्या क्रेव्हिंगला मात देऊ शकता.

शैली पोळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

शिळी पोळी बीपीच्या रुग्णांसाठी खूप फायदेकार आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात अनेकांना बीपीचा त्रास होतो. लोक बऱ्याच प्रकारची औषध घेऊन बीपी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे शिळी पोळी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leftover roti or chapati ladoo with few ingredients not down the marathi recipe asp