Mutton Chops Recipe In Marathi: बऱ्याचजणांसाठी नॉन व्हेज जीव की प्राण असते. काही खवय्ये तर नॉन व्हेज खाण्याची एकही संधी सोडत नाही. आपल्याकडे मटण सुक्का, मटण रस्सा, मटण खिमा, मटण बिर्याणी असे अनेक पदार्थ चवीने खाल्ले जातात. पण नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊ कधीतरी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी घरच्या घरी खुशखुशीत आणि चविष्ट मटण चॉप्स तयार करु शकता. घरी पाहुणे आल्यावर किंवा एखाद्या खास दिवशी हा पदार्थ बनवता येतो. खास नॉन व्हेज प्रेमींसाठी मटण चॉप्सची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य:
- मटण चॉप्स (अंदाजे अर्धा किलो)
- आलं-लसूण वाटण दीड मोठा चमचा
- हिंग अर्धा चमचा
- हळद अर्धा तमचा
- गरम मसाला दोन चमचे
- लाल तिखट दोन मोठे चमचे
- दही अर्धी वाटी
- लवंगा तीन
- दालचिनी अर्धा इंच
- हिरव्या मिरच्या २
- कोथिंबीर अर्धी वाटी
- अंड एक
- लिंबू अर्धा
- तेल दोन चमचे
- उकडलेले बटाटे अर्धा किलो
- ब्रेडक्रम्स ताजे
- मिरपूड अर्धा चमचा
- मीठ चवीनुसार
कृती:
- मटणाचे तुकडे धुवून घ्या. त्यांना आलं-लसणाचे वाटणस हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून कालवा.
- प्रेशर कुकरमध्ये बटाटे, थोडी हळद, मीठ घालून उकडवा. पुढे बटाटे सोला व कुस्करा.
- कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये मीठ व मिरपूड घाला, ते चांगलं एकत्र करा. त्या बटाट्याच्या मिश्रणाचे सहा भाग करा,
- प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात हिंग, लवंगा, दालचिनी टाकून ते तडतडू द्या.
- पुढे त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. अर्धा वाटी पाणी घाला व तीन शिट्ट्या होऊ द्या.
- गार झाल्यावर दही व लिंबाचा रस घाला. ते पुन्हा गॅसवर ठेवा आणि रस पूर्णपणे आटू द्या.
- हाताला तेल लावून कुस्करलेल्या बटाट्याचा एक भाग पसरा व त्यावर ते तुकडे ठेवा.बटाट्याच्या आवरणाने ते तुकडे बंद करा.
- एका भांड्यात अंडे फेटून घ्या. बटाट्याने आच्छादलेले मटणचॉप्स अंड्यात बुडवा.
- ते ब्रेड क्रप्समध्ये घोळवून तेलात शॅलो फ्रॉय करा. (मोठ्या गॅसवर -हाय फ्लेमवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत परता.)
आणखी वाचा – घरच्या घरी बनवा मटण, Non veg प्रेमींनी हमखास ट्राय करावी सोपी रेसिपी
(टीप – मटण चॉप्स हे हिरव्या चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर खाल्ले जातात. यासोबत तुम्ही कांदा घेऊ शकता. त्याशिवाय चॉप्सवर लिंबू पिळल्याने ते आणखी चविष्ट बनतात.)
First published on: 19-04-2023 at 14:19 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutton chops recipe in marathi make delicious mutton chops at home note the recipe yps