नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे.पोटाला आराम देण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. तुम्हीही उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या पदार्थांच्या पाककृती आम्ही सांगणार आहोत. चला तर आज पाहुयात झणझणीत उपवासाची मिसळ, तोंडाला चव आणणारी ही मिसळ तुम्हीही घरी करून बघून शकता. चला तर पाहुयात उपवासाची मिसळ कशी बनवायची..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
- शेंगदाणे – १ वाटी उकडलेले; अर्धी वाटी भाजलेले
- साबुदाणा – २ वाट्या (भिजवलेले)
- मिरच्या – ३ ते ४
- जीरे – १ चमचा
- दही – १ वाटी
- बटाटा भाजी – २ वाट्या
- फराळी चिवडा – १ वाटी
- मीठ – चवीनुसार
- तूप – १ चमचा
- काकडी, डाळींब – आवडीनुसार
‘उपवासाची मिसळ’ बनवण्याची कृती
- ‘उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी.
- शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमची बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी.
- एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी.
- त्यावर गोडसर दही, फराळी चिवडा आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.
- त्यावर बारीक चिरलेली काकडी घालावी.
हेही वाचा >> नवरात्रीच्या उपवासाला फक्त २ बटाट्यांपासुन उपवासाचा परफेक्ट शिरा, लगेच नोट करा सोपी रेसिपी
- ही गरमागरम चविष्ट मिसळ खायला अतिशय उत्तम लागते.
First published on: 15-10-2023 at 13:12 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2023 try once upavasachi misal recipe in marathi upavasache padarth recipe marathi srk