Pav Bhaji : पावभाजी हा असा पदार्थ आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो.अनेक जण वीकेंड आला की घराबाहेर पडतात आणि बाहेरची पावभाजी आवडीने खातात. आज आम्ही तुम्हाला पावभाजी घरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. पावभाजीची ही रेसिपी खूप सोपी आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही हॉटेलसारख्या स्वादिष्ट पावभाजीचा आनंद घेऊ शकता.

साहित्य

  • कांदा
  • टोमॅटो
  • फ्लॉवर
  • बटाटा
  • वाटाणे
  • शिमला मिरची
  • आलं लसणाची पेस्ट
  • लाल मिरची पावडर
  • पावभाजी मसाला
  • कोथिंबीर
  • तेल
  • तूप
  • मीठ

हेही वाचा : कोल्हापूर स्पेशल मिरची भजी! अशी बनवा टम्म फुगणारी मिरची भजी, ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

  • बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, फ्लॉवर आणि बटाटा घ्या. त्यात वाटाणे टाका.
  • कुकरमध्ये थोडं तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात या सर्व भाज्या टाका. या भाज्या तेलामध्ये परतून घ्याव्यात.
  • त्यानंतर त्यात पाणी टाका आणि कुकरमध्ये सर्व भाज्या मध्यम आचेवर तीन शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.
  • शिजलेल्या भाज्या रईने एकजीव करुन बारीक पेस्ट करुन घ्या.
  • एका कढईत तेल घ्या
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
  • कांदा चांगला परतून घ्यावा.

हेही वाचा : Masala Maggi : मॅगी प्रेमींनो, दहा मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मसाला मॅगी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या

  • त्यात आलं लसणाची पेस्ट टाका. त्यात लाल मिरची पावडर टाका
  • त्यानंतर त्यात पावभाजी मसाला टाका.
  • हे सर्व मसाले चांगले परतून घ्या आणि त्यात थोडे पाणी घाला.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात पेस्ट केलेल्या भाज्या टाका आणि एकजीव करा.
  • भाजी जास्त घट्ट होऊ नये म्हणून प्रमाणानुसार पाणी घाला.
  • त्यात चवीनुसार मीठ आणि तूप घाला
  • पाच मिनिटे पावभाजी शिजू द्या
  • गरमा गरम पावभाजीवर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम पावबरोबर ही भाजी सर्व्ह करा.