नेहमी घरच्या त्याच-त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी एकतर तुम्ही हॉटेलमधून काहीतरी वेगळी भाजी ऑर्डर करता किंवा यूट्यूब व्हिडीओ बघून घरी बनवण्याचा प्रयत्न करता. पण, अशाने एकच दिवस तुम्हाला चमचमित भाजी खाल्ल्याचा आनंद मिळतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात व्हेज तवा फ्राय भाजी कशीी करायची…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हेज तवा फ्राय भाजी साहित्य

  • १/२ कप कोबी
  • १/२ कप फ्लाॅवरचे तुकडे
  • ब्रोकोली ही घालू शकता
  • १ मोठा कांदा
  • १ मोठा बटाटा
  • १ मोठया टोमॅटोची प्युरी
  • ४-५ फरसबी शेंगा
  • १ गाजर
  • १ मोठी सिमला मिरची
  • १/४ कप हिरवा मटार
  • १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १ टेबलस्पून अमूल बटर
  • तेल
  • १ टीस्पून जीरे
  • १ तमालपत्र
  • १ टेबलस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टेबलस्पून कसुरी मेथी
  • १/४ टीस्पून चाट मसाला

व्हेज तवा फ्राय भाजी कृती

१. सर्व भाज्या स्वच्छ धुवून निवडून व चिरून घेणे. कांदा,कोबी,सिमलामिरची, गाजर, फरसबी‌ हे उभे चिरून घेणे. मटार दाणे सोलून घेणे.टोमॅटोच्या फोडी करून, मिक्सरमधून प्युरी तयार करून घेणे.

२. गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. तेल तापल्यावर भाज्या तेलात घालून, तळून घेणे.शेवटच्या भाज्या
थोड्या तळून झाल्या की, कोबी घालून, तो ही एक मिनिट परतून घेणे.

३. तळून घेतलेल्या भाज्या एका डिश मध्ये काढून घेणे. त्याच कढईतील तेलामध्ये तमालपत्र, जीरे घालून परतणे. कसुरी मेथी घालून परतणे.

४. आलं लसूण पेस्ट घालून, परतणे. चिरलेला कांदा घालून लालसर परतून घेणे. टोमॅटो प्युरी घालून १-२ मिनिटे परतवून घेणे.

५. तव्यावर अमूल बटर घालून, कढईतील भाजलेले सर्व साहित्य त्यावर घालून, एक मिनिट परतून घेणे. सर्व मसाले त्यावर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.

६. तळून घेतलेल्या सर्व भाज्या घालून, व्यवस्थित मिक्स करून घेणे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करणे. एक मिनिटभर ठेवून गॅस बंद करणे.

हेही वाचा >> भूक नसतानाही खावीशी वाटेल असे झणझणीत मसाला ढेमसे; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

७. वरून चाट मसाला घालून, व्यवस्थित मिक्स करून घेणे.खाण्यासाठी तयार व्हेज तवा फ्राय भाजी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veg tawa fry bhaji recipe in marathi hotel style gravy sabji bhaji recipe srk