विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय.विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात.विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास विदर्भ स्पेशल ढेमसाची झणझणीत भाजी

झणझणीत मसाला ढेमसे साहित्य

how to make Chilled and tasty Dahi Pohe recipe
थंडगार दही पोहे, एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या सोपी रेसिपी
how to make dahi vada at home recipe
Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
  • ७-८ ढेमसे
  • ४ कांदे बारीक चिरुन
  • १ वाटी सुके खोबरे किसुन
  • २ मोठे कांदे
  • १ टोमॅटो
  • २ चमचे खसखस
  • तिखट चवीनुसार
  • १/२ चमचा हळद
  • २ चमचे डाळवे
  • तुकडे काजुचे बारीक
  • ८,१० कीसमीस
  • १ चमचा वर्हाडी मसाला
  • १ चमचा धणेपुड
  • मीठ चवीनुसार
  • ५-७ लवंग,मीरे
  • तेल आवश्यकतेनुसार
  • अद्रक,लसूण
  • कोथिंबीर

झणझणीत मसाला ढेमसे कृती

१. प्रथम ढेमसे स्वच्छ धुवुन त्याला वरील बाजुने कापुन आतुन बिया काढुन पोखरुन घ्या. आणि गरम पाण्यात त्यांना आठ, दहा मिनीट वाफवुन घ्या.

२. आता यामध्ये भरण्याचा मसाला करुन घेऊ. त्यासाठी एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा परतुन घ्या. मग त्यात खोबऱ्याचा किस घालुन परता. मग हळद, तिखट, धणेपुड, एक चमचा खसखस, काजु, किसमीस घालुन आणि चवीनुसार मीठ घालुन मसाला परतुन घ्या. गार होऊ द्या. मसाला वाफवलेल्या ढेमसांमधे भरुन घ्या.

३. आता या ग्रेव्हीचा मसाला करुन घ्या. त्यासाठी दोन कांदे, टोमॅटो, लवंग, मीरे, आले लसुण, खसखस सगळे छान तेलात परतुन याचा मसाला वाटुन घ्या.

४. आता कढईत तेल गरम करुन यामध्ये वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतुन घ्या. यामध्ये हळद,तिखट, वऱ्हाडी मसाला, गरम मसाला घालुन छान परता. मग भरलेले ढेमसे घालुन पाच,सात मिनीट शिजु द्या.

५. आता यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालुन रस्सा करुन घ्या. चवीनुसार मीठ घाला,उकळी येउ द्या. गरम गरम मसाला ढेमसे तयार आहेत. वरुन कोथिंबीर घाला.

हेही वाचा >>नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

मस्त झणझणीत मसाला ढेमसे पराठ्यांबरोबर सर्व्ह करा.