‘संविधानच पालटून टाकले जाईल’ या भीतीपोटी भाजपला भारतीय मतदारांनी लोकसभेत पूर्ण बहुमत नाकारले. मग हे वास्तव स्वीकारून भाजपने गेल्या काही महिन्यांत ‘विरोधकांनी संविधान बदलाचे ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवले, असा प्रत्यारोप सुरू केला. त्यापैकी ‘फेक नॅरेटिव्ह’ हा शब्द सर्वतोमुखी झाला हे खरे, पण संविधानाचा अविभाज्य भाग मानला जाणारा ‘सेक्युलर’ हा शब्द राजकीय प्रचारात शिवीसारखाच जाहीरपणे वापरणारे नेते आणि खासगीत आरक्षणासह सर्वच प्रकारच्या समतेला विरोध करणारे अनुयायी ज्या पक्षात आजघडीला सर्वाधिक आहेत, त्याच पक्षाशी जवळीक असलेल्यांनी संविधानाचे सार सांगणाऱ्या प्रास्ताविकेविरुद्ध न्यायालयात तीनदा याचिका गुदरल्या आहेत आणि त्या साऱ्या २०१४ नंतरच्याच आहेत, हे कसे नाकारता येईल? यापैकी दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या एकत्रित सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान सोमवारी, ‘भावी सरन्यायाधीश’ म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या न्या. संजीव खन्ना यांनी पुन्हा एकदा ‘धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे अविभाज्य अंगच आहे’ असा निर्वाळा दिला, हे अपेक्षा वाढवणारे ठरते.
अन्वयार्थ : ‘सेक्युलर’विरोधात स्वामी, उपाध्याय…
‘भावी सरन्यायाधीश’ म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या न्या. संजीव खन्ना यांनी पुन्हा एकदा ‘धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे अविभाज्य अंगच आहे’ असा निर्वाळा दिला, हे अपेक्षा वाढवणारे ठरते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-10-2024 at 01:08 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc says secularism always held to be part of constitution s basic structure zws