Premium

नौदलाने असे यशस्वी केले ‘ऑपरेशन जॅकपॉट’…

४ डिसेंबर या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ‘ऑपरेशन जॅकपॉट’चा प्रत्यक्षदर्शीने वर्णिलेला थरारक अनुभव…

independence of Bangladesh, Operation Jackpot, Indian navy, commandos
नौदलाने असे यशस्वी केले ‘ऑपरेशन जॅकपॉट’… ( छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया )

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च, १९७१मधे पाकिस्तानी सैन्य पूर्व पाकिस्तानवर तुटून पडले होते. २५ मार्च, १९७१ला लेफ्टनन्ट जनरल टिकाखान यांनी तिथे ‘ऑपरेशन सर्च लाईट’ सुरू करून दोन दिवसांत जवळपास तीन लाख बंगाली विद्वान, विचारवंत, खेळाडू, कलाकार, लेखक, उद्योगपती, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सैनिक इत्यादींचा बळी घेतला होता. त्यावेळी फ्रान्समधील तुलों नौदल तळावर सामरिक अभ्यास करत असलेल्या, ‘पीएनएस मांगरो’ या पाकिस्तानी पाणबुडीवरील आठ बंगाली नाविकांनी पाणबुडी सोडून बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. फ्रान्समधून पळून आलेले हे बंगाली नाविक ३१ मार्च, १९७१ला स्पेनची राजधानी माद्रिदच्या भारतीय दूतावासात दाखल झाले. दूतावास प्रमुख, भारतीय परराष्ट्र सेवाधिकारी, सरदार गुरदीप सिंग बेदी यांनी त्यांचे पासपोर्ट तपासून त्याची माहिती दिल्लीला कळवल्यावर भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ दिल्लीला पाठवण्याचे निर्देश दिले. आठही जणांना हिंदू नावे देत, ते भारतीय असल्याचे भासवून माद्रीदहून बार्सिलोनामार्गे रोमला पाठवण्यात आल, मात्र ते भारतात जात असल्याची माहिती माध्यमांना आणि रोममधील पाकिस्तानी दूतावासालाही मिळाली. पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी या नाविकांची मनधरणी करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. मात्र, या नाविकांचे नेते अब्दुल वहीद चौधरी यांनी आपण बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल. हे आठही नौसैनिक दिल्लीत पोहोचताच त्यांना ‘रॉ’च्या (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) एका सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले .

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The thrilling experience described by an eyewitness of operation jackpot which played a significant role in independence of bangladesh asj

First published on: 04-12-2023 at 18:35 IST
Next Story
‘केसीआर’ यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा