What is the price of iPhone 17?: आज अखेर बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज लाँच झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ॲपलच्या आयफोन १७चे आज, अनावरण करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लागू केल्यानंतर सादर होणाऱ्या आयफोनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता होती . मात्र अॅपलने आयफोनच्या किमतीत कोणतीही वाढ न करता ग्राहकाना दिलासा दिला आहे.
दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या
आयफोन १७ – ७९९ डॉलर – भारतीय चलनात – ७०,४९६.८५
आयफोन १७ एयर – ९९९ डॉलर भारतीय चलनात – ८८,१४३.१२
आयफोन १७ प्रो – ११९९ डॉलर भारतीय चलनात – १,०५,७९३.१२
आयफोन 17 प्रो सिरीज लाँच
पूर्णपणे अल्युमिनियम बॉडीअसून आजवरची सर्वात मोठी बॅटरी, जास्त उष्णता सहन करण्याची शक्ती, ए १९ प्रो प्रोसेसर, मागील बाजूस सिरॅमिकचे आवरण आहे. केवळ इ सिमची सुविधा, प्रो कॅमेरा यंत्रणेमुळे व्यावसायिक दर्जाच्या फोटोची सुविधा असणार आहे.
कॅमेरा कसा असेल?
पुढील बाजूस १८ मेगापिक्सेलचा सेंटर स्टेज कैमरा, मागील बाजूस ४८ मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे, टेलिफोटो लेंस, आठपट प्रभावी लेन्स, ४८ एक्स डिनिटल झूम सुविधा, डॉल्बी विजन एचडीआर रेकॉर्डिंग, चित्रपटांसाठी ही चित्रिकरण करण्याइतकी सुविधा.
आयफोनमध्ये बॅटरी कशी असणार
आयफोन एयरमध्ये पूर्ण दिवस चालणारी बॅटरी, आयफोन एअरला जोडणारी आकर्षक पॉवर बँक असणार आहे.
आयफोन 17 एयरमध्ये कसा असणार कॅमेरा?
आयफोन एयरमध्ये ४८ एमपीचा फ्यूजन कॅमेरा, १२ एमपीचा पुरक कॅमेरा, अद्ययावत फोकस कंट्रोल, सेंटर स्टेज कॅमेऱ्यामुळे फोन न फिरवता उभे आडवे फोटो घेण्याची सोय, आयफोन एअरमध्ये केवळ इ सिमची सुविधा असणार आहे.
दमदार फिचर्ससह आयफोन 17 एयर लाँच
आजवरचा सर्वात स्लिम आयफोन, ५.६ मिमी जाडी, तिप्पट स्क्रैच प्रतिबंधक क्षमता, टायटेनियमची फ्रेम, एक्सडीआर डिस्प्ले, चार आकर्षक रंगात उपलब्ध.
ऐपल सिलिकॉन ए १९ प्रो
सर्वात वेगवान स्मार्टफोन सीपीयू असल्याचा दावा केला असून ए १८ च्या तुलनेत तिप्पट शक्तिशाली असणार आहे. तसेच या आयफोनमध्ये अद्ययावत वायरलेस तंत्रज्ञान,
मॅकबुकइतक्या ताकदीने काम करण्याची क्षमता असणार आहे
दमदार फिचर्ससह आयफोन 17 एयर लाँच, आजवरचा सर्वात स्लिम आयफोन
आयफोन १७ ६.३ इंचाचा डिस्प्ले, लॉक स्क्रीनवर लाइव्ह एक्टिविटी, एक्सडीआर डिस्प्ले, सिरॅमिक शील्डमुळे तिप्पट काच प्रतिबंधक शक्ती. तसेच ए १९ प्रोसेसरचा समावेश, सहा कोअर सीपीयू, १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटमुळे गेमिंगचा अनुभव अधिक प्रभावी, अॅपल इंटेलिजन्सचा प्रभावी आणि सुरक्षित वापर..
४८ मेगा पिक्सलचा कॅमेरा, आयफोन १६ च्या तुलनेत चौपट अधिक व्याप्ती, सेटर स्टेज फ्रंट कॅमेरा, एआयच्या माध्यमातून व्यक्तींच्या संख्येनुसार व्यापक फोटोस घेण्याची सुविधा.
गेल्या वर्षी आयफोन वापरकर्त्यांनी ५०० अब्ज सेल्फी घेतल्याचे कंपनीचे म्हणणे
अॅपल वॉच सिरीज ११ ची घोषणा
अॅपल वॉच सिरीज ११ मध्ये स्लीप ट्रैकिंग, हार्ट रेट, ब्रीदिंग सह आणखी नवीन आरोग्यविषयक वैशिष्ट्ये. वॉचमध्ये हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब यांचा अंदाज घेण्यासाठी नवीन अल्गोरिदम असणार आहे. तसेच २४ तास चालणारी जास्त बॅटरी क्षमताही आहे.
झोपेचा दर्जा जाणून घेण्यासही मदत करणार. झोपेच्या वेळा, कालावधी यांच्याआधारे स्लिप स्कोअर ठरवून झोपेबद्दल मार्गदर्शन करणार.
अॅपलचे एयरपॉड्स प्रो ३ अखेर लाँच; एयरपॉड्स श्रवणयंत्रासारखे करणार काम
कानावर घट्ट बसणाऱ्या एयरपॉड्समध्ये घाम किंवा पाण्यापासून संरक्षणाची सुविधा. व्यायाम करताना हृदयाचे ठोक्यांचीही नोंद ठेवणार. आयफोनशी समन्वयातून फिटनेसशी संबंधित बाबींची व्यायामादरम्यान माहिती देणार
iPhone 17 लॉन्चनंतर अगदी स्वस्त होणार हे मॉडल्स! हजारोंची होईल बचत
कंपनी iPhone 16 Pro Max, iPhone 16 Pro, iPhone 15 आणि iPhone 15 Plus बंद करण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत, iPhone 16 आणि iPhone 16 Plus च्या किमतीत घट होऊ शकते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, iPhone 15 ची किंमत सुमारे १०,००० रुपयांनी कमी करण्यात आली होती आणि 2023 मध्ये iPhone 14 ची किंमत देखील कमी करण्यात आली होती.
‘एआय’चा किती अंतर्भाव?
सध्याच्या एकूण ट्रेंडकडे पाहता आयफोन १७ मध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा पुरेपूर अंतर्भाव असेल, असे मानले जात आहे. मात्र, आयफोन १६च्या बाबतीत आलेल्या अनुभवानंतर ॲपलने ‘एआय’बाबत भूमिकेत कितपत बदल केला आहे, हेही आज रात्री होणाऱ्या अनावरण सोहळ्यानंतर स्पष्ट होईल. आयफोन १६मधील ‘एआय’ वैशिष्ट्यांचा ॲपलने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे आयफोन १६बद्दल बाजारात उत्कंठाही निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात या वैशिष्ट्यांचे ‘अपडेट’ आयफोन १६मध्ये येण्यात अनेक अडचणी आल्या. त्यातही ‘सिरी’मध्ये ‘एआय’चा अंतर्भाव करण्याची प्रक्रिया तर ॲपलला लांबणीवर टाकावी लागली.
यंदा काय नवे?
नवीन आयफोनमध्ये ‘एआय’ केंद्रीत अनेक वैशिष्ट्ये असतील. मात्र, त्याहीपेक्षा ॲपलचा भर नवीन आयफोनमधील कॅमेरा, बॅटरी, स्क्रीन या वैशिष्ट्यांबद्दल मांडणी करण्यावर असेल. त्यातही ‘आयफोन १७ एअर’ हा सर्वात कमी जाडीचा आयफोन यंदाचे खास वैशिष्ट्य असेल, असा अंदाज आहे. याखेरीज सर्वाधिक बॅटरी क्षमता असलेला ‘प्रो मॅक्स’हेदेखील आजच्या अनावरण सोहळ्याच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
नव्या आयफोनचे उत्पादन भारत, चीनमधूनच होणार
भारतासह अन्य राष्ट्रांवरील आयात शुल्क वाढवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा नारा दिला. त्याअंतर्गत ॲपलसह अन्य तंत्रज्ञान आणि वाहन कंपन्यांना अमेरिकेतच संपूर्ण उत्पादन घेण्याचे आवाहनही केले. आयफोनची निर्मिती अमेरिकेतच व्हायला हवी, याचा ट्रम्प यांनी अनेकदा पुनरूच्चार केला आहे. मात्र, तुर्तास आयफोनची निर्मिती भारत आणि चीनमध्येच होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी पुढील चार वर्षांत अमेरिकेत ५०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे मान्य केले होते. त्यात त्यांनी गेल्या महिन्यात आणखी १०० अब्ज डॉलरची भर टाकली. इतकेच नव्हे तर कूक यांनी ट्रम्प यांना २४ कॅरट सोन्याचा तळभाग असलेले एक शिल्पही भेट दिले. या ‘मनधरणी’नंतर ट्रम्प यांनी ॲपलच्या उत्पादनांवर अवाजवी आयातशुल्क लागू केलेले नाही. मात्र, तरीही आयफोनसह अन्य ॲपल उत्पादनांवर अमेरिका २५ टक्के आयातशुल्क लादते. त्यामुळे आयफोनच्या किमतीत वाढ होणे निश्चित मानले जात आहे.
‘ट्रम्प टॅरिफ’मुळे आयफोन महाग?
अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ॲपलच्या आयफोन १७चे आज, अनावरण होणार आहे. ॲपलच्या मुख्यालयात होणाऱ्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आयफोन १७ बद्दलची उत्कंठा ताणली गेली आहे. त्याबरोबरच नव्या आयफोनच्या किमतीकडेही जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लागू केल्यानंतर सादर होणाऱ्या आयफोनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. २०२० पासून ॲपलने आयफोनच्या मूळ मॉडेलची किंमत ८०० डॉलर इतकी ठेवली असून त्याची अतिप्रगत आवृत्तीची किंमत १२०० डॉलर इतकी जाहीर करण्यात येते. मात्र, ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे यात किमान ५० ते १०० डॉलरची वाढ होईल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. तसे झाल्यास भारतातही आयफोन १७ आणि त्याच्या प्रगत आवृत्त्यांची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.
भारतीयांचा आतापर्यंता सर्वात आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
काळ्या रंगाचा आयफोन सर्वाधिक पसंती भारतीयांचा सर्वाधिक पसंत असलेला आयफोन म्हणजे काळ्या रंगाचा आयफोन आहे. रिपोर्टनुसार, आयफोनच्या एकूण विक्रीमध्ये काळ्या रंगाच्या आयफोनचा हिस्सा २६.२ टक्के आहे. यानंतर निळ्या रंगाच्या आयफोनचा हिस्सा २३.८. टक्के आहे आणि सफेद रंगाच्या आयफोनचा हिस्सा २०.२ टक्के आहे. त्यामुळे भारतीयांना ग्राहकांमध्ये पसंत असलेल्या आयफोनमध्ये काळा, निळा आणि सफेद या तीन रंगाचा समावेश होतो. सादर करण्यात आलेल्या रिपोर्टवरून हे स्पष्ट आहे की भारतीय यूजर्स सिंपल आणि क्लासिक रंगांना अधिक महत्त्व देतात.
आयफोन १७ लाँच होण्यापूर्वीच अॅपल स्टोअर बंद
परंपरेप्रमाणे, कंपनीच्या बहुप्रतिक्षित “अवे ड्रॉपिंग” कार्यक्रमाच्या काही तास आधी अॅपल स्टोअर बंद झाले आहे. अॅपल सामान्यतः मोठ्या लाँच होण्यापूर्वी त्याचे ऑनलाइन स्टोअर बंद करते, ज्यामुळे चाहते नवीन आयफोन आणि इतर उत्पादनांच्या लाँच होण्याची वाट पाहत असताना उत्साह निर्माण होतो.
(Image: Bluesky/ Sonny Dickson)
(Image: Bluesky/ Sonny Dickson)