पुण्यातील स्वारगेट येथील एसटी बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने अनेक तालुक्यातील वाड्या वस्तीमधू मुली येथे शिक्षणासाठी नोकरीसाठी येतात. या घटनेनंतर पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलाच्या सुरक्षेबाबत कायमच चिंता व्यक्त केली जाते पण म्हणून मुलींनी घराबाहेर पडू नये हा काही पर्याय नाही. उलट मुलींना, महिलांना कोणत्याही संकटाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार केले पाहिजे. प्रत्येक महिलेने आणि मुलीने आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. घराबाहेर पडताना आपण कुठे जात आहोत आणि कधी परत येणार आहोत याबाबत घरच्यांना नेहमी सांगितले पाहिजे. तसेच बाहेरगावी प्रवास करताना, घरी पोहचयाला उशीर झाला तर मोबाईलवरून तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या कुटुंबियांना पाठवले पाहिजे. व्हॉटस्अॅपवर ही सुविधा फार पुर्वीपासून आहे पण लाइव्ह लोकेशन पाठवण्याची सुविधा गुगल मॅप्सवर देखील आहे. विशेष म्हणजे गुगल मॅप्सवर लाईव्ह लेकेशन शेअर केल्यानंतर तुम्ही घरापासून किती दूर अंतरावर आहात, तुमच्या फोनची बॅटरी किती टक्के बाकी आहे, सध्या जिथे आहे तेथून घरी यायला किती वेळ लागेल हे देखील समजू शकते. तसेच तुम्ही नोटिफिकेशनमध्ये गुगल मॅप्सवर तुमच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता त्यात जोडू शकता जेणेकरून तुम्ही घरून ऑफिसला पोहचला की तुमच्या कुटुंबाच्या मोबाईलवर तुम्ही ऑफिसला पोहचला हे नोटिफिकेशन जाते.

गुगल मॅप्सवरून लाईव्ह लोकेशन कसे पाठवावे?

  • प्रथम गुगल मॅप्स मोबाईलवर उघडा
  • गुगल मॅप्सवरून लाईव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर जा
  • तिथे लोकेशन शेअरिंग करू शकता.
  • त्यानंतर लोकेशन शेअर करताना तुम्हाला दोन पर्याय दिसतात पहिला असतो एक तासासाठी(For
    1 Hour) करतात.
    दुसरे पर्याय असतो जोपर्यंत तुम्ही हा पर्याय बंद करत नाही तोपर्यंत(Until You Turn Off)
  • यापैकी एक पर्याय निवडू शकता. आणि तुमच्या कॉन्टॅक लिस्टमध्ये जाऊन तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना ते पाठवू शकता.
  • तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन ऑन करा.

तुम्हाला घरी जायला उशीर झाला किंवा बाहेरगावी प्रवास करत असाल तर अशावेळी ही सुविधा नक्कीच उपयोगी ठरू शकते. या शिवाय प्रत्येक महिलेला सुरक्षा हेल्पलाईन नंबर माहित असले पाहिजे जेणेकरून कोणत्याही संकटात सापडल्यास तातडीने पोलिसांची मदत घेऊ शकता.

महाराष्ट्रातील महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक –

  • महिला हेल्पलाईन क्रमांक – १०९१/१०९८
  • आपत्कालीन पोलिस हेल्पलाईन क्रमांक – ११२
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you late to reach home from the office are you traveling alone in the countryside send your live location to your family on google maps learn how snk