How to download digital Voter ID on your Mobile know easy steps | Loksatta

घरबसल्या मोबाईलवर मिळवा डिजिटल वोटर आयडी; कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या

Download Digital Votar ID: डिजिटल वोटर आयडी मोबाईमध्ये कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या

How to download digital Votar ID on your Mobile know easy steps
डिजिटल वोटर आयडी मोबाईलमध्ये होणार उपलब्ध (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Download Digital Votar ID: मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोणतेही कामं करण्यासाठी आपण मोबाईलची मदत घेतो. महिन्याचा किराणा सामान ऑर्डर करण्यापासून, बँकेच्या व्यवहारांपर्यंत आपण सतत मोबाईलवर अवलंबुन असतो. सगळ्या गोष्टी मोबाईलवर उपलब्ध असतात, याप्रमाणेच आता वोटर आयडी कार्डदेखील मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

वोटर आयडी कार्ड मोबाईलवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. ते कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या.

आणखी वाचा: WhatsApp वर टेक्स्टसह फॉरवर्ड करता येणार फाईल्स; जाणून घ्या कोणाला वापरता येणार नवे फीचर

डिजिटल वोटर आयडी डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

  • https://eci.gov.in/e-epic/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटचा वापर करत असाल तर तुमच्या फोन नंबरसह तुम्ही निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करू शकता.
  • नोंदणी केल्यानंतर ‘डाउनलोड इ-एपिक’ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा एपिक क्रमांक म्हणजेच वोटर आयडीवर असणारा युनिक आयडी नंबर तिथे सबमिट करा.
  • त्यानंतर तुमचा डिजिटल वोटर आयडी डाउनलोड होईल.

डिजिटल वोटर आयडी डाउनलोड करण्यासाठी तुमचा फोन नंबर वोटर आयडीशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचा वोटर आयडी फोन नंबरशी लिंक नसेल तर सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तो लिंक करू शकता. कोणत्या आहेत त्या स्टेप्स जाणून घ्या.

आणखी वाचा: ‘गुगल मीट’वर शेअर करता येणार इमोजी; कसे वापरायचे फीचर जाणून घ्या

या स्टेप्स वापरून वोटर आयडीशी मोबाईल नंबर करा लिंक

  • https://www.nvsp.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, होमपेजवरील ‘Forms’ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘फॉर्म ८’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘सेल्फ’ किंवा ‘फॅमिली पर्याय निवडुन त्यात तुम्हाला हवे असलेले पर्याय निवडा.
  • त्यानंतर ‘Correction Of Entries In The Existing Electoral Roll’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला जो फोन नंबर वोटर आयडीशी लिंक करायचा आहे, तो सबमिट करा.
  • फोन नंबर लिंक होण्यासाठी थोडा वेळ लागेल.
  • नंबर लिंक झाल्यानंतर https://eci.gov.in/e-epic/  या वेबसाईटवर जा आणि EPIC नंबर सबमिट करून डिटेल्स वेरीफाय करा.
  • त्यानंतर ‘ओटीपी’द्वारे नंबर व्हेरीफाय करून ‘इ-एपिक’ डाउनलोड करा.

अशाप्रकारे फोन नंबर आणि वोटर आयडी लिंक करता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 13:31 IST
Next Story
Amazon Republic Day Sale: तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत भन्नाट फीचर्स असणारी ‘ही’ स्मार्टवॉच; जाणून घ्या