माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील म्हणजेच आयटी सेक्टरमधील अनेक नामांकित कंपन्यांनी नोकरीवरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखालील टाटा समूह पुढे सरसावला आहे. टाटा ग्रुपच्या मालकीच्या जाग्वार लॅण्ड रोव्हर (जेएलआर) या १०० वर्षांहून जुन्या वाहननिर्मिती क्षेत्रातील ब्रिटीश कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. इलेक्ट्रॉनिक कार निर्मितीसंदर्भातील कामांसाठी जाग्वार लॅण्ड रोव्हर या कर्मचाऱ्यांना नोकरीची ऑफर देणार असल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील टाटा मोटर्सच्या मालकीच्या जेएलआर कंपनीने शुक्रवारी त्यांच्या नोकरीसंदर्भातील पोर्टलवर ८०० नोकऱ्यांसंदर्भातील माहिती अपडेट केली आहे. स्वयंचलित म्हणजेच सेल्फ ड्राइव्ह कार, वाहनांचे इलेक्ट्रीफिकेशन, मशीन लर्निंगसारख्या क्षेत्रांमध्ये नोकरभरती करायची असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच डेटा सायन्स म्हणजेच तांत्रिक माहिती गोळा करण्यासंदर्भातील नोकऱ्याही उपलब्ध असल्याचं ‘जेएलआर’ने म्हटलं आहे.

आपल्या आलिशान गाड्यांसाठी जगभरामध्ये ओळख असलेल्या ‘जेएलआर’ने प्रथम प्राधान्य इलेक्ट्रॉनिक्स कारला या धोरण राबवण्याचं निश्चित केलं आहे. २०२५ पर्यंत ‘इलेक्ट्रीक-फर्स्ट’ हे उद्दीष्ट साध्य करण्याचा कंपनीचा मानस आहे. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या मोठ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीअंतर्गत काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांकडे कंपनीला लागणार कौशल्य असल्याचं ‘जेएलआर’चं म्हणणं आहे. ब्रिटन, आर्यलॅण्ड, अमेरिका, भारत, चीन आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये काम करण्याची संधी या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. म्हणजे योग्य उमेदवारास थेट परदेशातही नोकरी लागू शकते अशा ऑफर्स सध्या टाटांची मालकी असलेल्या ‘जेएलआर’कडे आहेत.

नव्याने जारी केलेल्या यादीमधील अनेक नोकऱ्या या ब्रिटनमधील आहे. या नोकऱ्यांची संध्या कंपनीच्या मॅंचेस्टर आणि गेडॉन या दोन कार्यालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती कंपनीचे प्रमुख माहिती अधिकारी अँथनी बीटेल यांनी दिली. “बऱ्याच काळापासून तिथे व्हेकन्सी उपलब्ध आहेत. काही कौशल्य असणारी माणसं त्या जागी भारणं हे फार आव्हानात्मक आहे कारण सध्याची बाजरपेठ फारच स्पर्धात्मक झालेली आहे. खास करुन सॉफ्टव्हेअर आणि आर्किटेक्ट क्षेत्रामधील कुशल नोकरदार तात्काळ मिळत नाहीत,” असं बीटेल यांनी ऑनलाइन माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना बीटेल यांनी, “आता नशीबाने अशी स्थिती निर्माण झाली आहे जी कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठीही फायद्याची आहे. सध्या आम्ही या संदर्भात पुढे जाण्याचा निर्णय घेत नोकऱ्यांची घोषणा केलेली असतानाच मोठ्या संख्येने सक्षम कर्मचारी उपलब्ध आहेत,” असं म्हटलं आहे. ट्वीटर, फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या कंपन्यांनी केलेल्या नोकरकपातीच्या पार्श्वभूमीवर बीटल यांनी हे विधान केलं.

‘जेएलआर’कडे असलेल्या नोकऱ्या या कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगसंदर्भातील क्षेत्रांमध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक कार्स कशापद्धतीने अधिक सक्षम बनवल्या पाहिजेत यासंदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी या लोकांचा उपयोग कंपनीला होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors owned jlr looks to hire hundreds of laid off tech workers scsg