Twitter Blue: मागच्या काही महिन्यांपासून ट्विटर हे सोशल मीडिया अ‍ॅप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. इलॉन मस्क यांच्याकडे या कंपनीची मालकी गेल्यापासून ट्विटरबद्दल ठराविक दिवसांनी नवीन अपडेट्स येत असतात. ट्विटरमध्ये ब्लू टिक हे महत्त्वपूर्ण फिचर आहे. ब्लू टिकची लोकप्रियता वाढल्यानंतर कंपनीने सर्वांसाठी ब्लू टिकच्या सब्सक्रिप्शनची नवी सुविधा सुरु करणार आहे. यामुळे ठराविक रक्कम भरुन तुम्ही अकाऊंटवर ब्लू टिक जोडू शकता. ही सेवा आयओएस, अँड्रॉइड आणि वेब यांमध्ये उपलब्ध असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन प्लॅन्स:

जर तुम्हाला महिन्याभरासाठी मोबाईलफोनवर ब्लू टिक हवं असेल, तर त्यासाठी 900 रुपये भरावे लागतील. तर एका महिन्यासाठी ही सुविधा वेबवर वापरायची असल्यास 650 रुपये कंपनीला द्यावे लागतील. कंपनीने भारतामध्ये ट्विटरने वेबवरील ब्लू टिकच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅननुसार वर्षभराचं सब्सक्रिप्शन घेतल्यास तुमच्याकडून एकूण 6,800 रुपये (महिन्याला 566 रुपये) आकारले जातील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter blue starts rolling out in india know how much to pay for monthly subscription yps
First published on: 09-02-2023 at 11:31 IST