Twitter हा सध्याचे आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतासह जगभरातील असंख्य लोक ट्विटरचा वापर करत आहेत. काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू टिक संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी ब्लू टिकसाठी सब्सक्रिप्शन फीचर सुरु केले होते. या प्रकरणामुळे ट्विटर आणि एलॉन मस्क या दोन गोष्टी ट्रेंडमध्ये होत्या. आपल्या धाडसी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले एलॉन मस्क यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. ट्विटर कन्टेंट क्रिएटर्संना जाहिरातीच्या मोबदल्यात पैसे देणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काही आठवड्यांमध्ये ट्विटर क्रिएटर्संना ads चा मोबदला म्हणून पैसे द्यायला सुरुवात करेल. प्रथम ब्लॉक पेमेंट हे एकूण $5M असणार आहे. लक्षात ठेवा. यासाठी क्रिएटर्सचे अकाउंट व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या जाहिराती या फक्त व्हेरिफाइट यूजर्संसाठी असतील” असे एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ट्विटरच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनी पदभार स्विकारल्यानंतर कंपनीने काही दिवसांनी सबस्क्रिप्शन प्रमोट करण्यासाठी आणि जाहिरातदारांना टिकवून ठेवण्यासाठी ठराविक गोष्टींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

ट्विटरचे मालकी हक्क एलॉन मस्क यांच्याकडे गेल्यापासून कंपनीला जाहिरातदारांना टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. ट्विटर लेऑफ प्रकरणामध्ये ट्विटरमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले. त्यानंतर जाहिरातींच्या प्लेसमेंट्सबाबत एलॉन मस्क प्रचंड सावध आहेत. मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर कंपनीचे व्यावसायिक संबंध बिघडले आहेत. यांमध्ये सुधारणा करण्यासाठी ते जाहिरात क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा – गुगल, अ‍ॅमेझॉननंतर मेटामध्ये होणार AI चा वापर; फेसबुक मेसेंजरमध्ये ChatGPT-style प्रॉम्प्टद्वारे बनवता येणार Stickers

ट्विटर ही कंपनी दर तासाला ५ ते ६ सेंट (अमेरिकन चलन) कमावते, जाहिरातींमध्ये सुधारणा केल्यास ते एका तासामध्ये १५ किंवा त्यापेक्षा जास्त सेंट मिळवू शकतील. असे मार्च महिन्यामध्ये मस्क यांनी सांगितले होते. यावरुन त्यांनी कमाई करत व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असे लोक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter owner elon musk said twitter will start paying creators for ads served in their replies see his tweet know more yps