Twitter source code leak: ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग सेवा पुरवणारी कंपनी आहे. भारतासह जगभरामध्ये या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी या मल्टीनॅशनल कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ट्विटरवर पूर्णपणे ताबा मिळवला. तेव्हापासून ट्विटर कंपनी खूप चर्चेत आहे. नुकतीच या कंपनीचा सोर्स कोड ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर आली. यामुळे कंपनीने अमेरिकेतील कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर न्यायालयाने ट्विटरला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या GitHub या इंटरनेट होस्टिंग सर्व्हिसवरुन सोर्स कोड डिलीट करायचे आदेश दिले आहेत. यानुसार गिटहबने ट्विटर सोर्स कोड डिलीट देखील केला आहे असे म्हटले जात आहे. याव्यतिरिक्त कंपनीने ज्यांनी ट्विटर अथॉरिटीच्या परवानगीशिवाय त्यांचा सोर्स कोड गिटहबवर पोस्ट केला आहे, त्यांची ओळख पटवून देण्यासाठीची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी कॉपीराइट अॅक्टचे उल्लंघन झाल्याचा आरोप देखील केला आहे. Source code ट्विटरसाठी महत्त्वपूर्ण का आहे? सोर्स कोड हा बेसिक कंप्यूटर कोड असतो. ट्विटरचे संपूर्ण सोशल नेटवर्क या सोर्स कोडवर अवलंबून असते. हा कोड लीक झाल्यामुळे ट्विटरच्या नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. नेटवर्कमध्ये फेरफार झाल्यास किंवा त्याचा गैरवापर केल्यास कंपनीचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आणखी वाचा - Whatsappमध्ये स्वत:चा डिजिटल अवतार तयार करुन DP ठेवायचा आहे? मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स या प्रकरणामुळे एलॉन मस्क यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या ऑनलाइन कोलॅबरेशन गिटहब प्लॅटफॉर्मवर ट्विटरचा सोर्स कोड पोस्ट करण्यात आला होता. या प्लॅटफॉर्मवरुन तो लीक झाला आहे. ट्विटर कंपनीशी संबंधित हे प्रकरण सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयामध्ये सुरु आहे. या गोष्टीचे गांभीर्य जाणून त्याबाबतीत न्यायालयाकडून दोषींवर कारवाई केली जाईल अशी कंपनीला आशा आहे.