Premium

Techy Marathi Exclusive: बॅटरी हेल्थ जपण्यासाठी चार्जर कसा निवडावा? फोन अपडेट केल्याने काही नुकसान होते का?

Battery Health & Mobiles System Update: लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजमध्ये आपण नव्या भागात ‘Techy Marathi’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धनंजय व प्रीतीला भेटणार आहोत.

Video Battery Health Guide How To Select Iphone Android Charger To Make Battery last Long Mobile System Update Cause Errors Techy Marathi
बॅटरी हेल्थ म्हणजे काय? कशी जपावी? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Battery Health & Mobiles System Update: लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजमध्ये आपण नव्या भागात ‘Techy Marathi’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धनंजय व प्रीतीला भेटणार आहोत. कठीण तांत्रिक गोष्टी सहज समजावून सांगणाऱ्या या जोडप्याने लोकसत्ताशी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्या लव्हस्टोरी पासून ते टेकी मराठी पेजच्या निर्मितीपर्यंत अनेक गोष्टींचा त्यांनी उलगडा केला. याच मुलाखतीत धनंजयने तुम्हा वाचकांसाठी काही खास टिप्सही शेअर केल्या आहेत. ‘बॅटरी हेल्थ’ या मुद्द्यावर चर्चा करताना धनंजयने केवळ आयफोनसाठीच नाही तर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सुद्धा चार्जिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे हे सांगितलेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅटरी हेल्थ म्हणजे काय? (What Is Battery Health)

बॅटरी हेल्थ म्हणजे तुमच्या मोबाईलच्या बॅटरीची कार्यक्षमता. आयफोनमध्ये बॅटरी हेल्थ ही टक्क्यानुरूप मोजली जाते. आयफोन खरेदी करताना बॅटरी हेल्थ १०० टक्के असते व जसजसे तुम्ही फोन वापरू लागता ती कमी होत जाते. बॅटरी हेल्थ साधारणपणे ८० टक्के किंवा त्यावर असेल तर फोन उत्तम स्थितीत आहे असे मानले जाते. त्याखाली जर तुमची बॅटरी हेल्थ गेली तर मात्र फोनची चार्जिंग वेळेआधीच संपणे, फोन सतत बंद पडणे असे त्रास होऊ शकतात. आयफोनमध्ये सेटिंग्स मध्ये तुम्हाला बॅटरी हेल्थ तपासण्याची सोय असते. तर अँड्रॉइड फोनसाठी असे काही ॲप (Accu Battery) आहेत ज्याने तुम्हाला बॅटरी विषयी तपशील जाणून घेता येऊ शकतात.

बॅटरी हेल्थ कशी जपावी? (How To Protect Battery Health)

१) चार्जर निवडतानाच तुम्ही काळजी घ्यायला हवी. चुकूनही नकली चार्जर घेऊ नका कारण अनेकदा हे चार्जर जलद चार्जिंगचा दावा करून बॅटरी हेल्थवर परिणाम करतात.
२) चार्जर घेताना सहसा १० – १५ Watt चे चार्जर घ्या. मागील दोन – तीन वर्षात अनेक फोनसाठी असेच चार्जर्स दिले जातात. याशिवाय तुम्ही फोनमध्ये ऑप्टिमाईज चार्जिंग पर्याय सुद्धा निवडू शकता ज्यामुळे तुम्हाला ८० टक्के चार्जिंग झाल्यावर नोटिफिकेशन पाठवले जाते.
३) फोन चार्जिंग करताना सहसा २० ते ८० टक्क्यांमध्ये बॅटरी असेल असे पाहावे. २० पेक्षा खाली आणि फार फार तर ८५ टक्के पेक्षा जास्त चार्जिंग करू नये.
४) जर तुम्ही स्लो चार्जिंग म्हणजेच १० ते १५ Watt चार्जर वापरून चार्जिंग करत असाल तर तुम्ही १०० टक्के चार्जिंग सुद्धा करू शकता.
५) काही फोनमध्ये ऑटोमेशन करण्याचा पर्याय असतो. ‘शॉर्टकट’ ॲप वापरून आपण फोन सेट करू शकता ज्याने ८० टक्के बॅटरी चार्ज झाल्यावर चार्जिंग आपोआप थांबते.

फोन अपडेट केल्यावर बॅटरी हेल्थ कमी होते का?

काही वेळा काहींना फोन अपडेट केल्यावर बॅटरी हेल्थ कमी होणं किंवा स्क्रीन हिरवी दिसणं अशा समस्या येतात पण म्हणून घाबरण्याचे कारण नाही. काही वेळा फोनच्या सुरक्षेसाठी अपडेट्स आवश्यक असतात. शिवाय काही नवीन फीचर्स सुद्धा फोनमध्ये यामुळे जोडले जाणार असतात. अशावेळी आपण फोन अपडेट करणे हे फायद्याचे ठरू शकते. पण चिंता टाळण्यासाठी आपण निदान एक वाट पाहावी. सोशल मीडियावर विशेषतः X वर अनेक युजर्स आपले अनुभव शेअर करत असतात यावरून आपण फोन अपडेट करावा की नाही हे ठरवू शकता. पण अपडेट्सने बॅटरी हेल्थ किंवा स्क्रीन खराब होतेच हा नियम नाही.

तुम्हाला वरील माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा!

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video battery health guide how to select iphone android charger to make battery last long mobile system update cause errors techy marathi svs

First published on: 29-11-2023 at 15:53 IST
Next Story
ॲपल वॉचची बॅटरी सारखी ड्रेन होत आहे? watchOS 10.1 अपडेट नंतर ‘हे’ जुगाड करून पाहा…