डोंबिवली : सतत मोबाईल बघते म्हणून भावाने मोबाईल काढून घेतल्याने १८ वर्षीय तरूणीची आत्महत्या

मोबाईलवर खेळत असल्याचे दिसल्यावर भावाने तिच्या हातामधील मोबाईल काढून घेतला.

addiction mobile
डोंबिवलीमधील शेलार नाका त्रिमूर्ती झोपडपट्टीतील धक्कादायक प्रकार (प्रातिनिधिक फोटो)

धाकटी बहिण सारखी मोबाईल बघत असते. घरात तिचे लक्ष नसते. या रागातून मोठ्या भावाने बहिणीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यामधील सीमकार्ड काढून टाकले. भावाच्या कृत्याचा राग येऊन १८ वर्षाच्या धाकट्याने बहिणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला असल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका भागात घडली. किरण शिवदास साहनी (१८) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

किरण आपल्या कुटुंबासह शेलार नाका येथील त्रिमूर्ती झोपडपट्टीत राहते. किरण ही नेहमी मोबाईलवरील खेळ खेळण्यात व्यस्त असते. तिच घरात लक्ष नसते. याची जाणीव किरणच्या मोठा भावाला झाली होती. तो तिला मोबाईलवर जास्त खेळू नकोस म्हणून सांगत होता. किरण त्याला दाद देत नव्हती. गुरुवारी किरण मोबाईलवर खेळत असल्याचे दिसल्यावर भावाने तिच्या हातामधील मोबाईल काढून घेतला. त्यामधील सीमकार्ड काढून टाकले. याचा किरणला खूप राग आला. ती काही बोलली नाही. वाद नको म्हणून भाऊ शेजारी निघून गेला.

थोड्याने वेळाने तो घरी परतला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. आतून किरण कोणताही प्रतिसाद देत नव्हती. भावाने खिडकीतून डोकावून पाहिले तर किरणने ओढणीने छताच्या लोखंडी आधारखांबाला गळफास घेतले असल्याचे दिसले.

भावाने तातडीने शेजाऱ्यांना बोलाविले. दरवाजा तोडून शेजारी आत गेले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. रुक्मिणीबाई रुग्णालयात किरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. मोबाईल हेही आता मृत्यूचे कारण होऊ लागल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 18 year old girl committed suicide due to mobile addiction scsg

Next Story
विक्रीकर विभागाची ९३ लाखांची फसवणूक; अज्ञात व्यापाऱ्यावर कल्याणमध्ये गुन्हा दाखल
फोटो गॅलरी