ठाणे : भिवंडी येथील टेमघर पाडा भागात वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करत एका १० वर्षीय मुलाला घरातून बाहेर आणून त्याला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेमघर पाडा भागात १० वर्षीय मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याची आई मजूरी करते. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारी महिला त्यांच्या घरी आली. तिच्या हातामध्ये लाकडी दांडका होता. त्या महिलेने मुलाला शिवीगाळ आणि मारहाण करत त्याला घराबाहेर आणले. त्यानंतर महिला आणि तिच्या मुलाने त्या मुलाला परिसरातील एका पेरूच्या झाडाला बांधून ठेवले. तसेच वाहनाचे नुकसान का केले याबाबत जाब विचारण्यास सुरूवात केली. मुलाने असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले असतानाही त्याला मारहाण करण्यात आली.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ सात गावांचा होणार समावेश

हेही वाचा – पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली

घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पथक त्याठिकाणी गेले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात महिला आणि तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 10 year old boy was tied to tree and beaten in temghar pada ssb