ठाण्यातील घोडबंदर येथील माजीवडा जंक्शन भागात मंगळवारी एक जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला याचा फटका बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजीवडा जंक्शन येथील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर एक जलवाहिनी आहे. मंगळवारी दुपारी ही जलवाहिनी फुटली. हे पाणी रस्त्याकडेला साचल्याने येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. जलवाहिनी दुरूस्तीसाठीची माहिती पाणी पुरवठा विभागास देण्यात आली आहे असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद

माजीवाडा जंक्शन येथील स्टेम प्राधिकरणाच्या 1350 MM पाईपलाईनला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर ठिकाणचा एअर वॉल्व तुटला आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी पाच ते सहा तास पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तरी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशिराने होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A water pipeline bursts in thane sgy