भिवंडी येथील कोनगाव भागात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविद कांबळे (३५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा- गोंदिया : अल्पवयीन मुलीचे लग्न लागणारच होते त्याचवेळी…
कोनगाव येथील गावदेवी मंदीर परिसरात गोविंद काबंळे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, कांबळे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 03-03-2023 at 14:10 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man was killed with a sharp weapon in bhiwandi dpj