कल्याण: टिटवाळा येथील बनेली भागातील तीन अल्पवयीन मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. या तीन मुलांचा कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती कोठेच आढळुन न आल्याने या मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली आहे. पोलिसांनी विशेष पथके तयार करुन या अपहृत मुलांचा शोध सुरू केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पोलिसांनी सांगितले, बनेली गावातील तीन वेगळ्या घरांमधील मुले खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी बनेली, टिटवाळा, मांडा भागात मुलांचा शोध घेतला. मुले कोठेच आढळुन आली नाहीत. मुलांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करुन मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. बनेली, मांडा, टिटवाळा भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून मुलांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
First published on: 24-08-2023 at 21:52 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abduction of three minors in titwala kidnapping complaint in police station ysh