वाढदिवसाच्या बॅनरऐवजी शैक्षणिक साहित्य वाटप करा ; आमदार संजय केळकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणाऱ्या बॅनरने संपूर्ण ठाणे शहर झाकोळून गेले असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र वाढदिवसाचे बॅनर लावू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

bjp
भाजपा (संग्रहित फोटो)

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणाऱ्या बॅनरने संपूर्ण ठाणे शहर झाकोळून गेले असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र वाढदिवसाचे बॅनर लावू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. बॅनरबाजी करण्याऐवजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच निवड झाली. या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करणारे बॅनर संपूर्ण शहरात जागोजागी लागले आहेत. यामुळे संपूर्ण शहर बॅनरने झोकाळून गेले आहे. असे असतानाच भाजप आमदार संजय केळकर यांनी मात्र वाढदिवसाचे बॅनर लावू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

आमदार केळकर यांचा ९ जुलैला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लागण्यास सुरुवात झाली असतानाच आमदार केळकर यांनी मात्र वाढदिवसाची बॅनरबाजी नको अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. वाढदिवसानिमित्त कोणतेही शुभेच्छांचे होर्डिंग, बॅनर लावू नये, जाहिरात करू नये. आपले निस्सीम प्रेम हेच माझ्यासाठी मौल्यवान शुभेच्छा आहेत. शिवाय जाहिरात ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्यास किंवा गरजवंतास मदतीचा हात दिल्यास माझ्यासाठी त्या शुभेच्छाच असतील,असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Allocate educational materials instead of birthday banners mla sanjay kelkar appeal amy

Next Story
ठाण्याच्या सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत मार्गदर्शन वर्ग; विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे पालिकेचे आवाहन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी