Fire In Chemical Company At Badlapur: बदलापूरमधल्या खरवई या भागात असलेल्या व्ही. के. केमिलकल कंपनीत आज पहाटे पाचच्या दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पेटली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. खरवई गावात ही कंपनी आहे. या ठिकाणी रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. पहाटे पाचच्या दरम्यान पाच स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की पाच किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जे कामगार जखमी अवस्थेत होते त्यांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीतल्या स्फोटाचे हादरे ४ ते ५ किलोमीटर लांब जाणवले ,या स्फोटात पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत ,या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते .या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असे कंपनीतील कामगारांचे म्हणणं आहे, बदलापूर अंबरनाथ , अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी मधील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आता ही आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An explosion took place at a maharashtra industrial development corporation plant in thane badlapur kharvai scj