ठाणे : भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिनी दुरुस्ती तसेच उदंचन केंद्रातील वीज मीटर बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे भिवंडी शहराचा पाणी पुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच या बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात स्टेम कंपनीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. स्टेमच्या शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर वीज मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासोबतच शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथील जल वाहिनीवर गळती होत असून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे भिवंडी शहराचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
या दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद
स्टेमकडून भिवंडी शहराला होणार पाणी पुरवठा मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ ते बुधवार, २३ जुलै रोजी सकाळी ९ असा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. यामुळे पुढील एक दिवस कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. याची नागरीकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
या भागात पाणी येणार नाही
ममता टाकी, चाविंद्रा गांव, पटेलनगर, बाला कंपाऊन्ड, फरीदबाग, बारक्या कंपाऊन्ड, संगमपाडा. कचेरीपाडा, कसारआळी. कोंबडपाडा, आदर्शपार्क, अजयनगर, नझराना कंम्पाऊंड, गोकुळनगर, इंदिरानगर, कल्याणरोड, ठाणगेआळी, तीनबत्ती, शिवाजीनगर स्टाफ क्वॉटर्स, गुरुचरणपाडा, अजमेरनगर, पटेल कंपा.. शमानगर, साईनाथ सोसायटी. अंजूरफाटा. देवजोनगर नारपोली, विठ्ठलनगर, सोनीबाई कंपाऊंड, खलीक कंपाऊंड, भंडारी कंपाऊंड, नारपोली गांव, देवजीनगर, आय.जी.एम. पाण्याची टाकी, निजामप्रा, इस्लामपुरा, आमपाडा.
अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शाश्रीनगर, नेहरूनगर, मिल्लत १.२.३. नविवस्ती, कोंडाजीवाडी, चव्हाणकॉलनी, वेताळपाडा, बाळा कंपाऊंड. खंडूपाडा, अंसार मोहल्ला, डोलारे पेट्रोलपंप, खोका कंपाऊंड, कामतघर, अंजूरफाटा, जुनो ताडाली. नवी ताडाली, भाग्यनगर, हनुमान नगर, कमला हॉटेल परीसर, गणेश सिनेमा, नवजीवन कॉलनी, पद्यानगर, अशोकनगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली. कापआळी, उर्दू रोड. कुरेशनगर, लाहोटी कंपाउन्ड, भादवड, टेमघर, वराळादेवी नगर, चंदनवाग, ओसवालवाडी, रेल्वे स्टेशन रोड, साठे नगर, नवीन ताडाळी, नदीनाका, हाजी कम्पाऊंड, पटेल नगर, खडकरोड, नागांव, असलम नगर, मुश्ताक कम्पाऊंड, पदमानगर वरचा भाग.
चोधरी कंपाउन्ड, कामतघर. पदमानगर बाळ पाटील चौक, पदमानगर गायत्रीनगर, आसबीबी परीसर, खडो मशीन रोड. कल्याण रोड, शास्रीनगर पोस्ट ऑफिस परीसर, गैबीनगर आंनद टाकीज मागच्या भागात, भारत कंपाऊन्ड, मुरळीधर कंपा. नारायण कंपा. सुभाषनगर गैबीनगर, गणेश सोसायटी गैबीनगर, अशोकनगर, गोपाळनगर, तीनबत्ती जैतूनपुरा इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.