कल्याण : कल्याण पूर्व द्वारली भागात आय प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेली ४२ जोत्यांची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त केली आहे. मागील काही महिन्यांतील आय प्रभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्व द्वारली भागात झाडे, झुडपे तोडून बेकायदा चाळी उभारणीसाठी भूमाफियांनी ४२ जोती बांधली असल्याच्या तक्रारी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्याकडे आल्या होत्या. साहाय्यक आयुक्त पवार यांनी त्या बांधकामांची खात्री कली. त्यानंतर तोडकाम पथक घेऊन द्वारली येथील ४२ जोत्यांची बांधकामे जेसीबाच्या साहाय्याने उध्वस्त केली.

या जोत्यांच्या बाजुला बेकायदा चाळी उभारणीसाठी भूमाफियांनी वीटा आणून ठेवल्या होत्या. या विटांची नासधूस पथकाकडून करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना एकही भूमाफिया कारवाईला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहता कामा नये असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांंनी सर्व साहाय्यक आयुक्तांना आदेश दिले आहेत. प्रत्येक प्रभाग साहाय्यक आयुक्त आपल्या प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी घेत असल्याचे समजते.

उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारली येथील जोत्यांची बांधकामे साहाय्यक आयुक्त पवार यांनी जमीनदोस्त केली. या कारवाईत माफियांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. आय प्रभाग हद्दीतील सर्व नव्याने उभी राहत असलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे, असे साहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले. या कारवाईमुळे माफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constructions of 42 foundation bases in dwarali area kalyan east demolished action taken by i division of kdmc asj