ठाणे : येथील उपवन तलाव परिसरात संस्कृती आर्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचा महोत्सव “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेवर आधारीत असणार आहे. लाईट व लेझर शो, आर्ट व क्राफ्ट वर्कशॉप, एडवेंचर स्पोर्ट्स हे महोत्सवाचे आकर्षण असणार असून हा महोत्सवासाठी प्रवेश विनामुल्य असणार आहे. या महोत्सवात ६०० पेक्षा जास्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होऊन आपली कला व्यासपीठावर सादर करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : भंडार्ली प्रकल्प पुन्हा अडचणीत, जागामालकांना हवी भाडेवाढ

विहंग प्रस्तुत आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने संस्कृती आर्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव २६, २७, २८, २९  जानेवारी या कालावधीत होणार आहे. यंदाचा महोत्सव “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेवर आधारीत असणार आहे. वसुधैव म्हणजे आपली पृथ्वी आणि कुटुंबकम् म्हणजे आपले विश्व. या उद्देशातून सर्वांनी एकत्र येऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि सर्व कलाकारांना प्रोत्साहित करावे, असा या संकल्पनेमागचा उद्देश आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्वांनी आनंदी आणि उत्साही राहून पर्यावरणाशी जवळीक साधूया, असेही ते म्हणाले. या महोत्सवाच्या उद्घाटनाला १००० पेक्षा जास्त शाळकरी मुले उपस्थित राहणार आहेत. तसेच चार दिवसात ६०० पेक्षा जास्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होऊन आपली कला व्यासपीठावर सादर करणार आहेत. त्यात पद्मश्री व पद्मभूषण उदित नारायण, डॉक्टर जसबिंदर नरुला, इंडियन आयडल सीजन १२ चा विजेता पवनदीप राजन, मैथिली ठाकूर तसेच इंडियन क्लासिकल सिंगर, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली, सावनी शेंडे, पंडित भीमना जाधव, पंडित अनिदो चॅटर्जी, दीपिका भिडे-भागवत, सारंगी वेदक, संगीत मिश्रा, लिओडेल ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. तसेच या महोत्सवात हँडीक्राफ्टचे स्टॉल्स व विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Culture art festival will be held in upvan area of thane zws