डोंबिवली : लैंगिक अत्याचार, गुन्हेगारीच्या वाढत्या घटना विचारात घेऊन डोंबिवली जवळील खोणी गावातील ग्रामस्थांनी गावामधील मस्जिदीमध्ये गावातील मुस्लिम समाजा व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या मुस्लिम धर्मियांना नमाजास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीचा निर्णयामुळे खोणी गाव हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे खोणी गाव हद्द परिसरातील मुस्लिम धर्मिय नमाज पठणासाठी खोणी गावाच्या वेशीवर आले. त्यावेळी खोणी ग्रामस्थांनी त्यांना संयमाने वस्तुस्थिती सांगून गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना, कल्याणमध्ये अत्याचारातून झालेली हत्या आणि वाढती गुन्हेगारी विचारात घेऊन गावातील महिला, मुली, लहान बाळांची सुरक्षितता महत्वाची असल्याने खोणी ग्रामस्थांनी बाहेरील मुस्लिम धर्मियांना गावात येण्यास शुक्रवारी प्रतिबंध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोणी गाव पलावा, दहीसर, मोरी, मुंब्रा परिसरात येते. प्रत्येक शुक्रवारी खोणी गावातील मस्जिदीमध्ये या भागातील मुस्लिम समाजातील नागरिक नमाजासाठी येतात. खोणी गावातील मुस्लिमांना नमाज पठणासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही. त्यांनी नियमितपणे त्यांचे धार्मिक कार्य करावे, त्याला आमचा विरोध नाही. फक्त बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना आमचा विरोध आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा…लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत

शुक्रवार असल्याने बाहेरील मुस्लिम नागरिक अधिक संख्येने गावात येतील म्हणून शुक्रवारी सकाळीच ग्रामस्थांनी मस्जिदीकडे जाणारा रस्ता अडथळे उभा करून बंद केला होता. खोणी परिसरातून मस्जिदीत नमाजासाठी आलेल्या नागरिकांना गावकीच्या निर्णयाची माहिती देऊन त्यांना परत पाठविण्यात येत होते. मानपाडा पोलिसांना ही माहिती मिळताच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण, डोंबिवली, दिवा ग्रामीण हद्दीतील बेकायदा चाळी, वस्त्यांमध्ये बांगलादेशी, नायजेरियन नागरिक राहण्यास आले आहेत. त्यामुळे गावांमधील नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. मुंबईतील मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगार डोंबिवली परिसरातून अटक केले जात आहेत.

हेही वाचा…कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत

गावातील महिला, भगिनी, विद्यार्थीनी यांची सुरक्षितता राखणे ही ग्रामस्थांची जबाबदारी आहे. खोणी गावात दर शुक्रवारी बाहेरून सुमारे दीड हजाराहून अधिक मुस्लिम नमाजासाठी येतात. बालिकांवरील लैंगिक अत्याचार, लव्ह जिहाद ही सगळी प्रकरणे पाहता गावची, गावातील महिलांची सुरक्षितता राखणे महत्वाचे वाटत असल्याने खोणी गावा व्यतिरिक्त बाहेरून गावात नमाजासाठी येणाऱ्यांना गावात येण्यास बंदी केली आहे. गावातील मुस्लिम धर्मिय फक्त या मशिदीत नमाज पढतील. आम्ही स्थानिक मुस्लिम, पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. हनुमान ठोंबरे ग्रामस्थ, खोणी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli due to rising crimes khoni village banned outside muslim prayers in mosque sud 02