|| मयुर ठाकुर.

भाजप  पक्षातून बंडखोरी केल्यामुळे भाजप आमदार नरेंद्र मेहताकडुन  जीवाला धोका – गीता जैन :-मिरा भाईंदर मधील  भाजप पक्षातील माजी महापौर  गीता जैन यांनी  बंडखोरी करून  निवडून लढवण्याचा निर्धार केल्यामुळे  विद्यमान आमदार नरेंद्र मेहता  यांच्याकडुन  धोका असल्याचा दावा स्वतः गीता जैन यांनी एका विडिओ द्वारे केला असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे आढळून आले आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच मिरा भाईंदर शहरातील राजनीती अधिक तापली असल्याचे आढळून आले आहे. भाजप पक्षातून  यंदा  निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या माजी महापौर  गीता जैन यांना तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा त्यांनी  निर्णय घेतला आहे. परंतु  आपण निवडणूक लढवत असल्यामुळे आपल्या जीवाला स्थानिक विद्यमान भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या मृत्यूचा कट रचला असल्याचा धक्कादायक आरोप एका विडिओ आणि पत्राद्वारे केल्यामुळे मिरा भाईंदरमधील राजकीय वातावरणाला  वेगळेच वळण लागले आहे.

” मी आज ही प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडवणीस  यांच्या भाजप विचारावर चालते परंतु मला तिकीट न दिल्यामुळे  मी  अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक  भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून  लोकांच्या  हिताकरिता आपण निवडणुक लढविण्याचे ठरवले आहे. माझी लोकांमध्ये  वाढती लोकप्रियतेमुळे आपल्या वर हल्ला करण्याकरिता  शहरात ४०० गुंडांना नरेंद्र महेता यांनी सक्रिय केले आहे ” असा आरोप गीता जैन यांनी पत्र आणि विडिओ द्वारे केल्यामुळे  सर्वत्र चर्चेचा विषय बनला आल्याचे आढळून आले आहे.