कल्याण मध्ये क्रेडीट कार्डचा वापर करुन नोकरदाराची फसवणूक |fraud with employee credit card use in kalyan | Loksatta

कल्याण मध्ये क्रेडीट कार्डचा वापर करुन नोकरदाराची फसवणूक

चार वेगळ्या व्यवहारांमधून एक लाख ९३ हजार रुपयांची रक्कम नोकरदाराच्या बँक खात्या मधून आपल्या खात्यात वळती करुन फसवणूक करण्यात आली.

कल्याण मध्ये क्रेडीट कार्डचा वापर करुन नोकरदाराची फसवणूक
प्रतिनिधिक छायाचित्र/ लोकसत्ता

कल्याण : कल्याण मधील एका नोकरदाराच्या क्रेडीट कार्डचा ऑनलाईन वापर करुन अज्ञात भामट्याने गेल्या महिन्यात रात्रीच्या वेळेत चार वेगळ्या व्यवहारांमधून एक लाख ९३ हजार रुपयांची रक्कम नोकरदाराच्या बँक खात्या मधून आपल्या खात्यात वळती करुन फसवणूक केली.आपण कोणाला धनादेश, क्रेडीट कार्ड दिले नसताना अचानक आपल्या बँक खात्यामधून अन्य दोन खात्यांमध्ये रक्कम वळती झाल्याने नोकरदार अमित घाडगे (४३, रा. मंगला सोसायटी, वाडेघर, कल्याण) यांना संशय आला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना ऑनलाईन व्यवहारात आपली भामट्याने फसवणूक केली असल्याचे लक्षात आले.

अमित यांच्या ॲक्सिस बँकेच्या क्रेडीट कार्डाचा भामट्याने व्यवहारासाठी वापर केला. दोन दिवसात रात्री बारा वाजल्यानंतर भामट्याने हे व्यवहार केले.क्रेडीट कार्ड द्वारे भामट्याने प्रथम ९७,९९५ रुपये, ३४ हजार, १९ हजार, ४१ हजार रुपये काढून घेतले. तसे लघुसंदेश अमित यांना प्राप्त झाले. त्यांनी तात्काळ आपल्या बँकेला कळवून पुढील व्यवहार थांबविण्याच्या सूचना केला. त्यामुळे त्यांची मोठी फसवणूक टळली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी अमित घाडगे यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विवाहाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बळकाविली मृताची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ; महिला अटकेत

संबंधित बातम्या

डोंबिवली: मुख्यमंत्र्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या डांबरी रस्त्यावरुन नागरिक संतप्त; निकृष्ट दर्जाच्या डांबरीचा वापर
“आज, उद्या, कधीही…”; राणेंविरोधात बॅनरबाजी करत शिवसेनेनं दिला इशारा
रेल्वे, ओएनजीसी मध्ये नोकरीला लावतो सांगून कल्याण मध्ये डाॅक्टरची १२ लाखांची फसवणूक
‘ती’ चित्रफीत प्रसारित करत खोटा गुन्हा नोंदविला; जितेंद्र आव्हाड यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट चर्चेत
जळगाव, पालघर, ठाणे शहरांमध्ये वाहने चोरणारा सराईत चोरटा अटक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा